8 February Headlines : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची (uddhav thackeray) आज दुपारी 12.30 वाजता मातोश्री येथे पत्रकार परिषद होणार आहे. उद्धव ठाकरे काय बोलणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. तसेच उपनेत्यांचीही बैठक बोलावण्यात आली आहे. उद्धव ठाकरे आजच्या पत्रकार परिषदेत काही महत्वाच्या मुद्द्यावर भाष्य करू शकतात. यात निवडणुक आयोग चिन्हा बाबत निर्णय द्याला का उशीर करतय,  अंधेरी पोट निवडणुकीच्या वेळी निवडणुक आयोगाने निर्णय देताना जी तत्पर्ता दाखवली ती दाखवणार का? असे प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात.


नवाब मलिकांच्या रुग्णालयातील प्रदीर्घ उपचाराविरोधातील ईडीच्या याचिकेवर आज सुनावणी (Nawab Malik)


मुंबई – नवाब मलिकांना घ्यावा लागणार का रूग्णालयातून डिस्चार्ज? ईडीनं नवाब मलिकांच्या प्रदीर्घ उपचारांवर सवाल उपस्थित करत कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी. कोर्टाच्या निर्देशानंतर नवाब मलिकांचा सरकारी डॉक्टरांच्या देखरेखीखाली करण्यात आलेला अहवाल आज कोर्टापुढे सादर केला जाईल. त्यानंतर मलिकांच्या पुढील उपचारांबाबत कोर्ट निर्देश देईल. न्यायालयीन कोठडीत असलेल्या नवाब मलिकांवर गेल्या अनेक महिन्यांपासून कुर्ल्यातील खासगी रुग्णालयात किडनीचे उपचार सुरू आहे. 


अर्थ संकल्पिय अधिवेशनाचा कालावधी ठरवण्यासाठी आज बैठक


विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीची आज बैठक होणार, सकाळी 10 वाजता होणार आहे. 27 फेब्रुवारीला मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनला सुरुवात होणार. तत्पूर्वी नियोजनासाठी बैठकीच आयोजन करण्यात आलं. या बैठकीत अर्थ संकल्प सभागृहात कधी मांडला जाणार याची तारीख ठरणार आहे. या समितीत बाळासाहेब थोरात देखील आहेत, ते आजच्या बैठकीला उपस्थित रहाणार का? हे पाहावं लागणार आहे.


रिजर्व्ह बॅक आज आपलं पतधोरण जाहिर करणार (RBI)


मुंबई – रिजर्व्ह बॅक आज आपलं पतधोरण जाहिर करणार आहे. रिजर्व्ह बॅक रेपो रेट मध्ये वाढ करण्याची शक्यता वर्तवली जातीये.


आदित्य ठाकरेंच्या शिव संवाद यात्रेचा आज तिसरा (Aaditya Thackeray)


आदित्य ठाकरेंच्या शिव संवाद यात्रेचा आज तिसरा दिवस. यात्रा आज जालन्यात असणार आहे. आजच्या दिवसातली शेवटची सभा बीडच्या गेवराई येथे होणार आहे.


हेमंत रासने यांची पदयात्रा


भाजप, शिंदे गट आणि मित्र पक्ष कसबा युतीचे उमेदवार हेमंत रासने यांची पदयात्रा, सकाळी 9.30 वाजता


संजय राठोड आज सोलापूरात


सोलापूर – संजय राठोड आज सोलापूरात असणार आहेत. सकाळी अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिर येथे जाऊन दर्शन घेतील. सकाळी 11 वाजता सोलापूरात बंजारा समाज सहविचार सभेत सहभागी होणार आहेत.