मुंबई : राज्यात सर्वत्र सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात 22 मार्च ते 20 एप्रिल या कालावधीत राज्यात कलम 188 नुसार 60,005 गुन्हे दाखल झाले आहेत. तर 13,381 व्यक्तींना अटक करण्यात आली असून 41,768 वाहने जप्त करण्यात आली आहेत, अशी माहिती पोलीस विभागाच्या वतीने प्रसिद्धीपत्रकामार्फत देण्यात आली आहे. उपरोक्त कालावधीत राज्यभरात पोलीस विभागाच्या 100 नंबर वर 75,115 फोन आले. त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली आहे.


राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर क्वॉरंटाईन असा शिक्का आहे, अशा 589 व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठवले. या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या 1062 वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले. परदेशी नागरिकांकडून व्हिसा उल्लंघनाचे 15 गुन्हे राज्यभरात नोंदवले आहेत. या कालावधीत झालेल्या विविध गुन्ह्यांसाठी 2 कोटी 30 लाख (2 कोटी 30 लाख) रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.




पोलिसांवर हल्ला
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पोलीस कर्मचारी अधिकारी दिवस-रात्र कार्यरत आहेत. मात्र, दुर्दैवाने या कालावधीत पोलिसांवर हल्ला होण्याच्या 121 घटनांची नोंद झाली असून यात 411 आरोपींना अटक करण्यात आली आहे. विनाकारण, बाहेर फिरणाऱ्या लोकांवर कारवाई करतेवेळी अशा अनेक घटना महाराष्ट्रात घडल्या आहेत. लोक कोरोनाच्या संकटापासून दूर राहावेत म्हणून पोलीस कर्मचारी बाहेर तैनात आहेत. मात्र, त्यांच्यावरच हल्ले होत असेल तर कठोर पावले उचलावी लागतील, असा इशारा राज्य सरकारने दिला आहे.




मुंबई, पुण्यात परिस्थिती गंभीर
राज्यातील सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण हे मुंबईत आहे. मुंबईत आताच्या घडीला तीन हजारापेक्षा जास्त कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, मृतांचा आकडाही मुंबईत जास्त आहे. पुण्यातही मुंबईत्या खालोखाल सहाशेहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. परिणामी लोकांच्या वाढत्या गर्दीमुळे मुंबई मेट्रोपोलिटिन रिझन (MMR) आणि पुणे मेट्रोपॉलिटीन रिझन ( PMR) क्षेत्रात जी शिथिलता देण्यात आली होती, ते सर्व निर्णय मागे घेण्यात आले आहेत. MMR मध्ये मुंबई शहर आणि उपनगर जिल्हा, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांचा समावेश. तर पुणे जिल्ह्यातील नागरी भाग म्हणजे पिंपरी चिंचवड, चाकण इत्यादी.


Ratan Tata | बिल्डरांमुळे शहर नियोजनाचा पुरता बट्ट्याबोळ : रतन टाटा