आज कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये एक डॉक्टर, एक पुरुष परिचारक आणि अन्य तीन लोकांचा समावेश आहे. यातील डॉक्टरांनी कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांनी आपली ट्रॅव्हल हिस्ट्री सांगण्याचं आवाहन केलं. याबरोबरच आपण किती लोकांच्या संपर्कात आलो याची माहिती देखील देण्याचं त्यांनी आवाहन केलं आहे. औरंगाबाद विभागात कोरोनाबाबत पोलीस आणि आरोग्य विभागासह इतर लोक काम करत आहेत. कोरोनावर नियंत्रण आणण्याचं काम चालू आहे. 29 बाधित लोक आहेत. त्यापैकी आज पाच जणांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. यातील 11 लोकांमुळे इतर लोकांना बाधा झाली असल्याची माहिती मिळाली आहे. आतापर्यंत 1300 चाचण्या शहरात झाल्या आणि 1000 स्क्रिनिंग झाली. सध्या शहरात 1300 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. औरंगाबादमध्ये कोरोनासोबत सारीचे देखील 228 रुग्ण आढळून आले आहेत. ताब्लिगीचे 102 लोक आले त्यांना विलगिकरन कक्षात ठेवले आहे.
कोरोना रुग्णांच्या आकडेवारीतील घोळ दूर करा, देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे विनंती
राज्यातील ग्रीन, ऑरेंज झोनमध्ये उद्योगधंद्यांना परवानगी
कोरोनामुळे अर्थव्यवस्था चिखलात रुतले आहे. अर्थचक्र हे फिरले पाहिजे म्हणून काही ठिकाणी मोजक्या स्वरूपात उद्योगधंद्यांना आपण परवानगी देत आहोत. ग्रीन झोन आणि ऑरेंज झोनमधील माफक स्वरूपात आपण उद्योगांना परवानगी देत असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दुपारी जनतेशी लाईव्ह संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
Kolhapur PPE Kit | इचलकरंजीमध्ये सर्व निकष पाळून पीपीई किटची निर्मिती