नवी दिल्लीः मुंबईतल्या रस्ते घोटाळ्यांचा प्रश्न काल दोन्ही सभागृहात गाजल्यानंतर केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील रस्त्यांसाठी 50 हजार कोटींचे वार्षिक बजट गडकरी यांनी जाहीर केलं आहे.
महाराष्ट्रात येत्या 5 वर्षात 2 लाख कोटींचे रस्ते बांधारणार असल्याचं गडकरींनी नवी दिल्लीतल्या पत्रकार परिषदेत जाहीर केलं. अमेरिकेतला लॉस एंजिलिस ते सँनफ्रान्सिस्को असा पॅसिफिक सागरी मार्ग कोकणातही तयार व्हावा यासाठी किनारी रस्ता बांधण्याचा निश्चय गडकरी यांनी केला आहे.
गडकरी यांनी यापूर्वीही औरंगाबाद, वर्धा येथील कार्यक्रमात मराठवाडा आणि विदर्भातील रस्त्यांसाठी मोठा निधी जाहीर केला होता. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील रस्त्यांसाठीही निधीची घोषणा केली होती. मात्र आता नव्याने जाहीर केलेल्या या घोषणेच्या अंमलबजावणीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.