औरंगाबाद: औरंगाबादमधून तब्बल 5 लाख रुपयांच्या नवीन बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. औरंगाबाद पोलिसांनी ही कारवाई केली आहे. जप्त केलेल्या नोटांमध्ये शंभर, पाचशे आणि दोन हजारांच्या नव्या नोटांचा समावेश आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका प्रिंटरससह दोघांना ताब्यात घेतलं आहे. माजिद खान आणि बिसमिल्ला खान असं अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत.

42 वर्षाचा बिसमिल्ला खान हा या खोटा नोटा तयार करत होता. पाच लाखांच्या खोट्या नोटांसाठी तो अडीच लाख घेत होता. अशी माहिती समजते आहे. हुबेहुबे दिसणाऱ्या या खोट्या नोटा चटकन ओळखणं कठीण आहे. पोलिसांना यासंबंधी माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सापळा रचून माजिद खान आणि बिसमिल्ला खान यांना अटक केली.

याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असली तरी यामागे नेमका कोणाचा हात आहे याचा देखील पोलीस तपास करत आहेत. तसेच यासाठी कोणतं रॅकेट काम करतं का याचाही शोध सध्या सुरु आहे.

दरम्यान, बनावट नोटांना आळा बसावा हे देखील नोटाबंदीचं एक कारण कारण होतं. मात्र, काही महिन्यातच नव्या खोट्या नोटा बाजारात आल्यानं नोटाबंदीच्या या उद्देशाला काहीशा प्रमाणात धक्का बसला आहे.

संबंधित बातम्या:

रायगडच्या सुधागड पालीत सुमारे सव्वादोन कोटींच्या जुन्या नोटा जप्त