4th July Headline : राज्यात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींच्या नाट्यानंतर अनेक महत्त्वपूर्ण बैठका पार पडणार आहेत. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे मुंबईमध्ये दाखल होणार आहेत. तसेच उद्धव ठाकरे यांनी देखील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची देखील बैठक बोलावली आहे. तर अजित पवारांच्या कार्यालयाचे देखील मुंबईत उद्घाटन करण्यात येणार आहे. शंघाई  सहयोग परिषदेच्या होणाऱ्या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईन सहभागी होणार आहेत.  बैठकीत चीनचे राष्ट्रपती शी जिंनपिंग, रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतिन, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ सुद्धा सहभागी होणार आहेत. 


अजित पवारांच्या सहभागानंतर पहिलीच मंत्रीमंडळाची बैठक



राष्ट्रवादी कॉग्रेस सरकार मध्ये सहभागी झाल्यानंतर मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडणार आहे. ही बैठक सकाळी 11 वाजता होणार आहे. त्यामुळे सातत्याने गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांवर टीका करणारे हे नेते  एकाच मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाहायला मिळणार आहेत.


अजित पवारांना बोलावली महत्त्वपूर्ण बैठक 



उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक 5 जुलै रोजी पार पडणार आहे. त्याचसंदर्भात चर्चा करण्यासाठी सकाळी अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे.  बोलवण्यात आली आहे


काँग्रेसची महत्त्वाची बैठक 



राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या आमदाराची तातडीची बैठक होणार आहे.या बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,  बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि इतर सर्व आमदार राहणार उपस्थित आहेत. 


अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन 



अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयाच मुंबईत उदघाटन होणार आहे.मंत्रालयासमोरील  A/5 बंगला येथे अजित पवारांचं नवं कार्यालय असणार आहे.


ठाकरे गटाची बैठक


अजित पवारांच्या बंडानंतर  उद्धव ठाकरेंनी सर्व नेत्यांची बैठक बोलावली आहे. शिवसेना भवनात ही बैठक दुपारी 12.30 वाजता पार पडणार आहे. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे पत्रकार परिषद देखील घेणार आहेत. 


बृजभूषण सिंह विरोधात सुनावणी 


बृजभूषण प्रकरणी पॉस्को केस संदर्भात पटियाला हाऊस कोर्टात सुनावणी होणार आहे.त्यामुळे या सुनावणीमध्ये पुढे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.