मुंबई : मालाड मालवणी येथे इमारतीच्या वरचा मजला बाजुच्या घरावर कोसळून झालेल्या दुर्घटनेबाबत पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी संबंधीत सर्व यंत्रणांशी संपर्क साधून दुर्घटनेची माहिती घेतली. आपत्तीग्रस्तांना सर्व प्रकारची मदत तातडीने उपलब्ध करुन देण्यात यावी, अशा सूचना त्यांनी महापालिका जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाला दिल्या.या दुर्घटनेमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला असून त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत केली जाईल, असे त्यांनी जाहीर केले.


या  दुर्घटनेमध्ये इतर 13 जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करुन त्यांना सोडण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, महापालिका कामगार, पोलीस यांच्यासह स्थानिक नागरीकांच्या मदतीने दुर्घटनाग्रस्त ठिकाणी तातडीने मदतीचे काम सुरु करण्यात आले. घटनेमध्ये दोघांचा मृत्यू झाला. इतर सर्व  13 जणांना सुखरुपपणे बाहेर काढण्यात आले. त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार करुन त्यांना सोडण्यात आले.


दुर्घटनाग्रस्तांना चांगल्या दर्जाचे उपचार देण्यात यावेत. तसेच त्यांच्यासाठी तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था करण्यात यावी अशा सूचना आदित्य ठाकरे यांनी प्रशासनाला दिल्या. त्याचबरोबर इमारतीच्या उर्वरित भागातील घरांचीही इतरत्र तात्पुरती व्यवस्था करण्यासाठी त्यांना मदत करण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.


दुर्घटनाग्रस्त कुटुंबियांना तातडीने मदत उपलब्ध करुन द्यावी, अशा सूचना पालकमंत्री ठाकरे यांनी जिल्हा प्रशासनास दिल्य. तसेच मुख्यमंत्री सहायता निधीमधून मृतांच्या कुटुंबियांना अतिरिक्त मदत मिळण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याबाबत जिल्हा प्रशासनास सूचना देण्यात आल्या आहेत.


Building in Fort collapse | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घटनास्थळी दाखल




संबंधित बातम्या :

Building in Fort collapse | मुंबईत फोर्ट परिसरात भानुशाली इमारतीचा भाग कोसळला, दोघांचा मृत्यू