मुंबई : मुंबईत आज सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे आणि अशातच फोर्ट परिसरात भानुशाली बिल्डिंगचा मोठा भाग कोसळला आहे. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत, अशी माहिती मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिली. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काहीजण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे.


मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी केली. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडूनही त्यांनी माहिती घेतली आहे. कोसळलेली इमारत म्हाडाकडून खाली करण्यात आली होती. या इमारतीत दुरुस्तीचे काम सुरु होते.


मात्र, काही लोक इमारत खाली करण्याच्या सूचनेनंतरही इमारतीत वास्तव्यास होते. आतापर्यंत 9 लोकांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. एक जखमी महिला हॉस्पिटलला जे.जे हॉस्पिटलला पाठवलंय. आज सकाळीच इमारतीच्या मालकानं इमारत खाली करवून घेतली होती अशी माहिती मिळत आहे.