सांगली : सांगलीत गावगुंडाच्या भीतीनं ज्या मुलींना शाळेत जाणं अवघड बनलं होतं, त्या गावगुंडावर अखेर कारवाई केली गेली आहे. याप्रकरणात राजेंद्र पवार, इंद्रजित खोत, सागर खोत आणि अमयसिद्ध बबळेश्वर या चौघांवर पाठलाग करणं, विनयभंग करणे, असे गुन्हे दाखल झाले आहेत.

 

सांगलीच्या वाळवा तालुक्यातल्या मसुचीवाडी या गावासह अनेक गावातील मुलं, मुली बोरगाव याठिकाणी शिक्षणासाठी येतात. मात्र, त्यादरम्यानच्या वाटेवर गावगुंड नेहमी मुलींची छेडछाड काढायचे. त्याला कंटाळून मुलींना बोरगावात न पाठवण्याचा निर्णय मसुचीवाडीच्या लोकांनी घेतला होता.

 

धक्कादायक म्हणजे गेल्या 2 वर्षांपासून हा सर्व प्रकार सुरु असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे. मात्र आता तब्बल दोन वर्षांनी गावगुंडावर कारवाई करण्यात आली आहे.