सातारा : सातारा, सांगली आणि रत्नागिरी जिल्ह्यात आज पहाटे 5 वाजून 20 मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 3.5 इकती होती.


कोयना परिसरापासून 21 किलोमीटर अंतरावर असलेल्या वारणेतील जवळे गावाजवळ भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची माहिती आहे. परंतु सांगली जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये भूकंपाचे धक्के सर्वाधिक जाणवले.

याशिवाय साताऱ्यातील कराड भागासह कडेगाव तालुका, तसंच रत्नागिरीच्या देवरुख, संगमेश्वर आणि चिपळूणच्या काही भागातही भूकंपाचे धक्के जाणवले.

भूकंपाची तीव्रता कमी असली तर त्याचा कालावधी जास्त होता. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. भूकंपानंतर काही नागरिक घराबाहेर आले. सुदैवाने भूकंपात जीवित अथवा वित्तहानी झालेली नाही.

भूकंप आल्यानंतर नेमकं काय करावं?, त्यावर एक नजर टाकूया

भूकंप आल्यानंतर घरातून मोकळ्या जागेत, मैदानावर जावं

फ्लायओव्हर, ओव्हर ब्रीजपासून गाडी मोकळ्या मैदानात न्यावी

इमारती, झाडं, विजेच्या खांबांपासून दूर राहावं

इमारतीबाहेर पडण्यासाठी लिफ्टऐवजी जिना वापरावा

एखाद्या ठिकाणी अडकलात तर जास्त छावपळ करु नका

खिडकी, कपाट, फॅन, आरसे अशा वस्तूंपासून दूर राहावा

घरगुती गॅस सिलेंडर तातडीने बंद करा

डोक्यावर फळी, जाड पुस्तक ठेवून गुडघ्यावर बसावं

टेबल, डेस्क, बेड अशा मजबूत वस्तूंच्या खाली आधार घ्यावा

उघडझाप होणारे दरवाजे आणि खिडक्यांपासून दूर राहा

गाडीमध्ये असाल तर बिल्डिंग, होर्डिंग, खांबांपासून दूर राहा

मजबूत वस्तू नसेल तर एखाद्या भक्कम भिंतीखाली आसरा घ्यावा

आपत्कालीन सेवांचा नंबर नेहमीच जवळ बाळगा

फोटो : भूकंप आल्यानंतर काय करावं?