29th April Headlines: शुक्रवारी राज्यातील 147 बाजार समित्यांमध्ये मतदान झालं. त्यापैकी 95 समित्यांची मतमोजणी आज होणार आहे. 34 बाजार समित्यांची मतमोजणी शुक्रवारीच झाली आहे. त्यामध्ये राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत. या निवडणुका म्हणजे राज्यातील आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीची रंगीत तालीम असल्याचं सांगितलं जातंय.
आज राज्यातील 95 बाजार समित्यांचा निकाल
राज्यातील 95 बाजार समित्यांचा आज निकाल
प्रमुख बाजार समिती आणि प्रमुख लढती
- पुणे - हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीची मतमोजणी. राज्यातील दुसरी मोठा बाजार समिती.
- मंचर - बटाट्याची बियाणे विक्रीसाठी राज्यात एक नंबर. माजी मंत्री दिलीप वळसे पाटील विरुद्ध माजी खासदार शिवाजी आढळराव अशी राजकीय प्रतिष्ठेच्या लढती. मतमोजणी सकाळी 10.30 वाजता.
- मावळ - आमदार सुनील शेळके विरुद्ध माजी राज्यमंत्री बाळा भेगडे राजकीय प्रतिष्ठेची लढत.
- इंदापूर - भाजप राष्ट्रवादी एकत्र विरुद्ध शिवसेना, बारामतीमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध भाजप.
- नीरा - अजित पवार विरुद्ध विजय शिवतारे.
- दौंड - अजित पवार विरुद्ध राहुल कुल.
- सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती - हळद, बेदाणा सौदे साठी प्रसिद्ध - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील, काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम, भाजपाचे कामगार मंत्री सुरेश खाडे आणि खासदार संजयकाका पाटील प्रतिष्ठा पणाला.
- इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती - सोयाबीनच्या सौद्यासाठी प्रसिद्ध - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील विरुद्ध -काँग्रेस,भाजप, शिवसेना नेत्याची प्रतिष्ठा पणाल.
- विटा कृषी उत्पन्न बाजार समिती - शेतीमाल सौदे आणि जनावराचे बाजार साठी प्रसिद्धआमदार मोहनराव कदम, शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर, राष्ट्रवादीचे माजी आमदार सदाशिवराव पाटील यांची प्रतिष्ठा पणाला.
- नाशिक - पालेभाज्या आणि भाजीपाल्यासाठी प्रसिद्ध - वार्षिक उलाढाल अठराशे ते दोन हजार कोटी - शिवाजी चुंभळे आणि देविदास पिंगळे यांच्यात मुख्य लढत, गेल्या काही वर्षांपासून वादग्रस्त.नाशिक / पिंपळगाव - कांदा आणि टोमॅटोसाठी प्रसिद्ध - वार्षिक उलाढाल 2 हजार 125 कोटी - राष्ट्रवादी आमदार दिलीप बनकर आणि उबाठा गटाचे माजी आमदार अनिल कदम आमने सामने.
- अहमदनगर - संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती, जिल्हा अहमदनगर - कांदा , टोमॅटोसह सर्व प्रकारचा भाजीपाला व भुसारमालसाठी प्रसिद्ध - आजी - माजी महसूलमंत्र्याची प्रतिष्ठा पणाला लागली असून माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात अनेक वर्षांपासून एकहाथी सत्ता आहे. यावेळी विद्यमान महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वात पॅनल उभा राहिला असून 97 टक्के मतदान झालं आहे.
- नागपूर - रामटेक बाजार समितीत काँग्रेस आमदार सुनील केदार आणि शिंदे गटाचे आमदार आशिष जयस्वाल यांनी हात मिळवणी करत सहकार पॅनल लढवले आहे. तर काँग्रेसचा स्थानिक उर्वरित गट तसेच भाजप मधील एक गट त्यांचे त्यांचे दोन वेगवेगळे स्वतंत्र पॅनल लढवत आहेत. त्यामुळे त्रिकोणी लढतीमुळे या बाजार समितीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
- अमरावती - पश्चिम विदर्भाची सर्वात मोठी असलेली अमरावती बाजार समितीच्या निवडणूकीचा निकाल लागणार आहे.. 2 हजार कोटी रुपयांच्या वरती उलाढाल असलेल्या या बाजार समितीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याठिकाणी आमदार यशोमती ठाकूर आणि आमदार रवी राणा यांच्या पॅनलमध्ये थेट लढत होणार असून ठाकरे गटाच्या एका गटानेसुद्धा आपलं वेगळं पॅनल उभं केल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे.
- भंडारा - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मतदार संघातील लाखनी बाजार समितीच्या निवडणुकीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत..
- धुळे - दोंडाईचा बाजार समिती भरड धान्यसाठी प्रसिद्ध आहे, वार्षिक उलाढाल दीडशे ते 200 कोटींची आहे.... दोंडाईचा बाजार समितीत आमदार जयकुमार रावल विरुद्ध माजी मंत्री हेमंत देशमुख यांच्या पॅनल मध्ये मुख्य लढत झाली होती.
नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समिती मिरची आणि भुसार मालाची मोठी बाजार पेठ - आदिवासी मंत्री विजयकुमार गावित आणि शिंदे गटाचे नेते चंद्रकांत रघुवंशी - राजकीय प्रतिष्ठेच्या लढती - शहादा बाजार समिती -घोड्यांचा बाजार आणि चण्याची सगळ्यात मोठी बाजारपेठ -मंत्री विजयकुमार गावित आणि भाजपा आमदार राजेश पाडवी - राजकीय प्रतिष्ठेच्या लढती
- परभणी - गंगाखेड - गंगाखेड मध्ये रासप आमदार रत्नाकर गुट्टे,राष्ट्रवादीचे माजी आमदार मधुसूदन केंद्रे यांचे महाविकास आघाडीचे पॅनल व भाजप नेते संतोष मुरकुटे यांचा पॅनल अशी तिरंगी लढत आहे.
- परभणी जिंतुर, सेलु आणि बोरी येथे थेट भाजप आमदार मेघना बोर्डीकर विरुद्ध राष्ट्रवादीचे माजी आमदार विजय भांबळे यांच्या पॅनल मध्ये लढत आहे.
वाशिम - राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार सुभाष ठाकरे विरुद्ध काँग्रेस शिवसेना ठाकरे गट आणि वंचीत बहुजन आघाडी आणि तिसरी आघाडी चे असे साडे तीन पेनल उभे आहेत. - जळगाव - धान्य आणि भाजीपाला या साठी ही बाजार समिती प्रसिद्ध आहे - जामनेरया ठिकाणी मंत्री गिरीश महाजन आणि महा विकास आघाडीचे संजय गरुड यांच्या पॅनलमधे लढत आहे.
- नांदेड - भोकर, हिमायतनगर, कुंटूर बाजार समितीचा आज निकाल आहे.भोकर मतदारसंघ हा अशोक चव्हाण यांचा विधानसभा मतदारसंघ आहे आणि इकडे भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या आव्हान आहे. उद्या सकाळी 10.00 वाजता मतमोजणीला सुरवात होणार आहे.
- बीड - केज विधानसभा मतदारसंघ अंतर्गत येणाऱ्या अंबाजोगाई बाजार समितीची निवडणूक मोठी प्रतिष्ठेची ठरली परळी नंतर अंबाजोगाई च्या बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी स्वतः लक्ष घातल्याचे पाहायला मिळाले..अंबाजोगाई बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये भाजपाविरुद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष पाहायला मिळाला यापूर्वी अंबाजोगाईच्या बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती 18 सदस्य संख्या असलेल्या बाजार समितीची वार्षिक उलढाल पावणे दोनशे ते दोनशे कोटी रुपयांचे आहे..
- बीड - अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये भाजपाकडून आमदार नमिता मुंदडा यांनी ताकद पणाला लावली होती तर राष्ट्रवादी काँग्रेस कडून माजी आमदार संजय दौंड राजकिशोर मोदी यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.
- चंद्रपूर - सोयाबीन, भाजीपाला, तूर, चना, फळासाठी - राजकीय प्रतिष्ठेच्या लढती - खासदार बाळू धानोरकर विरुध्द माजी पालकमंत्री विजय वडेट्टीवार आणि पालकमंत्री सुधीर मुनगंटीवारॉपंढरपूर बाजार समिती मतमोजणी - विद्यमान सत्ताधारी प्रशांत परिचारक गटाने 5 जागा बिनविरोध जिंकल्या असून आज 13 जागांवर मतमोजणी होत आहे . भाजपचे प्रशांत परिचारक याना राष्ट्रवादीचे भगीरथ भालके , कल्याण काळे आणि गणेश पाटील गटाने छुपा पाठिंबा दिल्याने निवडणूक एकतर्फी होत आहे . सत्ताधारी परिचारक यांच्या विरोधात विट्ठल सहकारी साखर कारखाना अध्यक्ष अभिजित पाटील आणि मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी आव्हान दिले आहे . वार्षिक 480 कोटींची उलाढाल असणाऱ्या पंढरपूर बाजार समितीमध्ये डाळिंब आणि बेदाणा सौदे मोठ्या प्रमाणात होत असतात.
- पंढरपूर आणि अकलूज - बाजार समिती मतमोजणी - विद्यमान सत्ताधारी प्रशांत परिचारक गटाने 5 जागा बिनविरोध जिंकल्या असून आज 13 जागांवर मतमोजणी होत आहे . भाजपचे प्रशांत परिचारक याना राष्ट्रवादीचे भगीरथ भालके , कल्याण काळे आणि गणेश पाटील गटाने छुपा पाठिंबा दिल्याने निवडणूक एकतर्फी होत आहे . सत्ताधारी परिचारक यांच्या विरोधात विट्ठल सहकारी साखर कारखाना अध्यक्ष अभिजित पाटील आणि मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी आव्हान दिले आहे, अकलूज बाजार समिती मध्ये सत्ताधारी मोहिते पाटील विरुद्ध राष्ट्रवादी , काँग्रेस आणि मोहिते विरोधक अशी लढत होत आहे . यामध्ये सत्ताधारी विजयसिंह मोहिते पाटील पॅनल विरुद्ध त्यांचे पुतणे डॉ धवालसिंह मोहिते पाटील यांचे पॅनल अशीच लढत.
- छत्रपती संभाजी नगर-- या बाजार समितीत एवढे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत भाजप आमदार हरिभाऊ नाना बागडे विरुद्ध काँग्रेसचे माजी आमदार विक्रम काळे अशी लढत, वैजापूर----शिंदे गट भाजप विरुद्ध भाजप दुसरा गट, ठाकरे गट, काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र.आमदार शिंदे गट रमेश बोरणारे विरुद्ध माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर अशी लढत , कन्नड----एकूण 5 पॅनल निवडणूक लढवत आहेत.सर्वधिक 86 उमेदवार या निवडणुकीत उभे आहेत.उद्धव ठाकरे शिवसेनेचे विद्यमान आमदार उदयसिंह राजपूत विरुद्ध नुकताच बी आर एस मध्ये गेलेले माजी आमदार हर्षवर्धन जाधव अशी लढत या निवडणुकीत पाहायला मिळेल,या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य भाजप चे किशोर पवार यांच्या नेतृत्वातील पॅनल ची सुद्धा मोठी लढत होऊ शकते.
बारसू रिफायनरी संबंधित पालकमंत्री उदय सामंत बैठक घेणार
रत्नागिरी - रिफायनरी विरोधात स्थानिक आक्रमक झाल्यानंतर आज पालकमंत्री उदय सामंत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेणार आहेत आणि या संदर्भात सविस्तर माहिती घेणार आहेत ( तसचं 201 आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात , 164 महिला आणि 37 पुरुषांचा समावेश , राजापूरच्या न्यायालयात आज हजर करणार )
राहुल गांधींच्या आव्हान याचिकेवर आज गुजरात उच्च न्यायालयात सुनावणी
अहमदाबाद - काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दाखल केलेल्या आव्हान याचिकेवर आज गुजरात उच्च न्यायालयात सुनावणी होईल. सुरत सत्र न्यायालयाने मानहानीच्या खटल्यात राहुल यांना दोषी ठरवण्याला स्थगिती देण्यास नकार दर्शवला. त्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका राहुल यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. कर्नाटकमध्ये मागील लोकसभा निवडणुकीतील (2019) प्रचारावेळी राहुल यांनी मोदी आडनावाविषयी टिप्पणी केली. त्याबद्दल गुजरातमधील भाजपचे आमदार पुर्णेश मोदी यांनी राहुल यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल केला. त्याप्रकरणी सुरतमधील न्यायदंडाधिकारी न्यायालयाने राहुल यांना दोषी ठरवले. त्यांना दोन वर्षे तुरूंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. त्यामुळे त्यांची खासदारकी रद्द झाली होतील