मुंबई : आजच्या दिवशी इतिहासात काय घडलं हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. अनेक चांगल्या वाईट घटनांनी इतिहासातील तारखा नोंदलेल्या असतात. आजच्या दिवशी म्हणजे 26 डिसेंबर रोजी बाबा आमटे यांचा जन्म झाला होता. तसेच त्यांचा मुलगा प्रकाश आमटे यांचा देखील आज जन्मदिवस आहे.  स्वातंत्र्यसैनिक उधम सिंह यांचा देखील जन्म झाला होता. 25 डिसेंबर 1925 रोजी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना करण्यात आली होती. आजच्या दिवशी इतिहासात काय घडलं हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. अनेक चांगल्या वाईट घटनांनी इतिहासातील तारखा नोंदलेल्या असतात. 


1899: स्वातंत्र्यसैनिक उधम सिंह यांचा जन्म


उधम सिंह हे महान क्रांतिकारी आणि स्वातंत्र्यसैनिक होते. 25 डिसेंबर 1899 रोजी त्यांचा जन्म झाला होता. सरदार उधम सिंह यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला म्हणून जनरल डायरला लंडनमध्ये गोळ्या घालून घेतला होता.


1914 : बाबा आमटे यांचा जन्मदिन


मुरलीधर देवीदास आमटे ऊर्फ बाबा आमटे यांचा 26 डिसेंबर 1914 रोजी जन्म झाला होता.  कुष्ठरोग्यांच्या शुश्रूषेसाठी त्यांनी चंद्रपूर , महाराष्ट्र येथे आनंदवन नावाचे आश्रम त्यांनी सुरू केले. ते कुष्ठरोग्यांसाठी आणि समाजातील इतर उपेक्षितांसाठी खूप झटत होते .याशिवाय 'वन्य जीवन संरक्षण', 'नर्मदा बचाओ आंदोलन' अशा इतर सामाजिक चळवळींमध्येही त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे. बाबा आमटे यांना आधुनिक भारताचे 'संत' या नावाने गौरवले आहे.मुरलीधर देवीदास ऊर्फ बाबा आमटेंचा जन्म महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाट येथील जमीनदार कुटुंबात झाला.  आपण स्वतः डॉक्टर बनावे असे बाबांचे विचार होते. परंतु वडिलांच्या आग्रहाखातर ते वकील झाले. यानंतर त्यांनी काही काळ वकिलीही केली. 


1919 : प्रसिद्ध संगीतकार नौशाद अली यांचा जन्मदिवस


प्रसिद्ध संगीतकार नौशाद अली यांचा आज जन्मदिवस आहे. नौशाद अली यांचा जन्म 25 डिसेंबर 1919 रोजी उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथे झाला. नौशाद यांनी 'कोहिनूर' (1960), 'गंगा-जमुना' (1961), 'सन ऑफ इंडिया' (1962), 'लीडर' (1964), 'दिल दिया दर्द लिया' (1965), 'पाकीजा' (1971) ,  'तेरी पायल मेरे गीत' (1989) सह अनेक चित्रपटांना संगीत दिले. 2005 मध्ये आलेल्या 'ताजमहल: एन इटरनल लव्ह स्टोरी' या चित्रपटात त्यांनी शेवटचे संगीत दिले होते. बीआर चोप्रा यांच्या 'हुब्बा खातून' चित्रपटासाठीही त्यांनी संगीत दिले होते, मात्र हा चित्रपट कधीच प्रदर्शित झाला नाही. नौशाद यांनी त्यांच्या कारकिर्दीत केवळ 67 चित्रपटांना संगीत दिले, पण लोक आजही त्यांची गाणी ऐकतात. 5 मे 2006 रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला.


1925 : भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना


भारतीय कम्युनिस्ट पक्ष (CPI) हा भारतातील एक कम्युनिस्ट पक्ष आहे. या पक्षाची स्थापना 26 डिसेंबर 1925 रोजी कानपूर शहरात झाली. भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना एम.एन. राय यांनी केली. 1928 मध्ये कम्युनिस्ट इंटरनॅशनलने भारतात कम्युनिस्ट पक्षाची स्थापना केली. डी राजा हे या पक्षाचे सरचिटणीस आहेत. हा भारतातील सगळ्यात जुन्या पक्षांपैकी एक आहे. या पक्षाला निवडणूक आयोगाने राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता दिली आहे.


1973 : प्रकाश आमटे यांचा जन्म


प्रकाश आमटे हे  बाबा आमटे यांचे द्वितीय पुत्र आहेत. 23 डिसेंबर 1973 पासून ते, त्यांच्या पत्‍नी डॉ. मंदाकिनी आमटे (माहेरच्या डॉक्टर भारती वैशंपायन) यांच्यासह गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथे लोकबिरादरी प्रकल्प या नावाने स्थानिक आदिवासी लोकांसाठी दवाखाना चालवतात, तसेच लोकांनी आणून दिलेल्या जखमी वन्य प्राण्यांवरही ते उपचार करतात. त्यांचाही जन्म 26 डिसेंबर रोजी झाला होता. 


इतर महत्त्वाच्या घडामोडी


1530: पहिला मुघल सम्राट, हिन्दुस्थानातील मुघल सत्तेचा संस्थापक बाबर याचे निधन
1895: लुईस आणि ऑगस्ट लुइम यांनी तिकीट विक्री करून पहिल्या चित्रपटाचा पहिला शो पॅरिस येथे प्रदर्शित केला
2006: अभिनेते कृष्णचंद्र मोरेश्वर तथा दाजी भाटवडेकर यांचे निधन