22 March Headlines : गुढीपाडव्याच्या निमित्ताने राज्यभरात विविध शोभायात्रा यात्रा आणि कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. 


मुंबई -  गिरगावच्या फडके गणेश मंदिरापासून सकाळी 8 वाजल्यापासून शोभा यात्रेला सुरूवात होणार आहे. साडेतीन शक्तीपीठावर आधारित चित्ररथ हे या शोभा यात्रेतलं मुख्य आकर्षण असणार आहे. आर्य चाणक्य यांच्या हातात 22 फुटी गुढी या चित्ररथात साकारली जाणार आहे. 


डोंबिवली - गुढीपाडव्यानिमित्त नववर्ष स्वागत यात्रा सकाळी 6:45 वाजता सुरू होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकाळी 8.30 वाजता येतील. आकाश ठोसर आणि सायली पाटील डोंबिवलीमध्ये सकाळी 7 वाजल्यापासून असेल. सोनी मराठीची टीम हास्य जत्रा सकाळी 6.30 वाजल्यापासून शोभायात्रेत होणार आहेत.


ठाणे – कोपिनेश्र्वर मंदिर न्यासा सकाळी 7 वाजता कोपिनेश्र्वर मंदिर, तलावपाळी येथून शोभा यात्रा निघणार आहे.


मुलुंड शोभायात्रा – मुलुंड गुढीपडवा शोभा यात्रा समिती आयोजित गुढी पाडवा शोभायात्रा सकाळी 7.30 वाजता निघेल. चिंतामणराव देशमुख उद्यान ते संभाजी मैदान निघणाऱ्या यात्रेत पारंपरिक वेशभूषा, ढोल ताशा पथक, लेझीम असेल. 


कोल्हापूर  – गुढीपाडव्याच्या निमित्ताने कोल्हापुरातील मिरजकर तिकटी येथून सकाळी 9.30 वाजता शोभा यात्रा सुरू होणार आहे. या शोभायात्रेत सुरूवातीला बाईकर्स त्यानंतर बैलगाड्या, मर्दानी खेळ, झिम्मा फुगडी, लेझीम पथक, ढोल पथक राजपथप्रमाणे साडेतीन शक्तीपीठाचा देखावा आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असणार आहे. 


पुणे – पुण्यात बावधन परिसरात शोभा यात्रा असणार आहे, सकाळी 7.30 वाजता. या यात्रेमध्ये साधारण 500 लोक असतील. पोवाडा, लेझीम, ढोल पथक अशी पारंपरिक पद्धतीची यात्रा असेल. 


नाशिक – भद्रकाली येथून शोभायात्रा निघणार आहे, सकाळी 7 वाजता. 


नागपूर – सिद्धिविनायक ट्रस्टकडून सकाळी 6.30 वाजता नववर्षाच्या स्वागतासाठी शोभायात्रा निघते. नागपूरच्या तात्या टोपे नगर गणेश मंदिरातून निघून ही मिरवणूक लक्ष्मीनगर चौकात पोहचेल. तेथे सामूहिक रामरक्षा पठणाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहण्याची शक्यता आहे.


मनसेचा गुढीपाडवा मेळावा (Mns Gudi Padwa Melava)


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांचा गुढीपाडवा आज शिवाजी पार्कवर होणार आहे. मनसेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात राज ठाकरेलयांनी पाडवा मेळाव्यात सगळ बाहेर काढणार असल्याचा इशारा दिला होता. यामुळे पाडवा मेळाव्यात राज ठाकरे काय बोलतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


जालना – 'दुःखी' राज्य काव्य पुरस्कार वितरित होणार 


उर्दू शायर स्व. हरिश्चंद्र सहानी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मराठी कविता आणि साहित्यातील समग्र योगदानाबद्दल 'दुःखी' राज्य काव्य पुरस्कार वितरित केल्या जातो यावेळी हा पुरस्कार विजय चोरमारे यांना दिली जाणार आहे. यावेळी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते कवितेचा पाडवा या कार्यक्रमात वितरित केला जाणार आहे, संध्याकाळी 7 वाजता.