24 February Headlines: कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. तर, काँग्रेसचे तीन दिवसीय अधिवेशन छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये सुरू आहे. आपचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे मुंबई दौऱ्यावर असणार आहेत. 



पोटनिवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस


- कसबा आणि चिंचवडच्या निवडणूकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. संध्याकाळी 5 वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. दोन्हीही मतदारसंघात सर्वपक्षियांकडून प्रचारावर भर असणार आहे. सर्वच पक्षांचे मोठे नेते पुणे आणि चिंचवडमध्ये तळ ठोकून बसल आहेत. कसबा आणि चिंचवडमध्ये 26 फेब्रुवारीला मतदान होणार आहे.


 
छत्तीसगढमध्ये काँग्रेसचे अधिवेशन


- आजपासून छत्तीसगडमधील रायपूर येथे काँग्रेसचे तीन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन सुरु होत आहे.  


- आज 24 फेब्रुवारीला सकाळी 10 वाजता काँग्रेसच्या स्टिरिंग कमेटीची बैठक होणार आहे. त्यानंतर 4 वाजता सब्जेक्ट कमेटीची बैठक होणार आहे. त्यात आर्थिक, राजकीय, आंतराष्ट्रीय संबंध, कृषी व किसान कल्याण, युवा रोजगार व शिक्षा आणि सामाजिक सक्षमीकरण या प्रस्तावावर चर्चा होणार आहे. 25 आणि 26 फेब्रुवारी रोजीदेखील विविध विषयांवर ठराव आणि चर्चा होणार आहेत.


- महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांमध्ये नाशिक पदवीधर विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने सुरू झालेल्या वादाबाबत काँग्रेस नेतृत्व काही निर्णय घेण्याची शक्यता आहे.


दिल्ली 


- श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणात आफताब पूनावाला याला आज कोर्टासमोर हजर केल जाणार... दुपारी 2 वाजता जिल्हा न्यायधिशांसमोर आफताबला हजर केल जाणार


मेघालय 


- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शिलांग आणि तुरामध्ये प्रचार करणार. जाहीर सभा आणि प्रचार सभांचे आयोजन करण्यात आले आहे. 


 रत्नागिरी 


- केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांचा रत्नागिरी जिल्हा दौरा


अहमदनगर 


-  शेवगाव तालुक्यात शेतकरी विकास मंडळाच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलनांची हाक देण्यात आली आहे. भोंगळ डेफर्ड लाईव्ह)


 मुंबई 


- वैद्यकिय कारणास्तव जामिनासाठी नवाब मलिकांनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. 


- आम आदमी पक्षाचे नेते, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आज मुंबई दौऱ्यावर आहेत. 


- शालेय शिक्षण विभागाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार’ प्रदान समारंभ 



हिंगोली 


- आज हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीच्यावतीने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन केले जाणार आहे.


नांदेड 


- केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी दोन दिवशीय नांदेड जिल्हा दौऱ्यावर असणार आहेत.


 
परभणी 


- परभणीत स्वर्गीय अडव्होकेट शेषरावजी भरोसे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ 23 ते 27 फेब्रुवारी दरम्यान "भव्य संजीवनी महोत्सव" राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन


 चंद्रपूर 


- आजपासून चांदा क्लब ग्राउंडवर 5 दिोवसीय जिल्हास्तरीय कृषी महोत्सव व पशु-पक्षी प्रदर्शनी आयोजित करण्यात आले आहे.


वाशिम 


- सुभद्राआई बहुउद्देशीय संस्था आणि इतर 151 सामाजिक संस्था यांच्या वतीने वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये आज 501 जोडप्याचा सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे. खासदार भावना गवळी आणि सामाजिक कार्यकर्ते संजय आधारवाडे यांच्या उपस्थितीत विवाह सोहळा पार पडणार आहे.