22 December In History : 22 डिसेंबरचा दिवस इतिहासात अनेक मोठ्या घटनांनी नोंदवला गेला आहे. आजच्या दिवशी म्हणजे 22 डिसेंबर 1666 रोजी शिखांचे 10 वे गुरू गोविंद सिंग यांचा जन्म झाला. भारताचे महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मही आजच्या दिवशी झाला. प्रसिद्ध लावणी लेखक श्रीधर कृष्णाजी कुलकर्णी तथा पठ्ठे बापूराव यांचे निधन आजच्या दिवशी झाले.
1666 : शिखांचे 10 वे गुरू गोविंद सिंग यांचा जन्म
शिखांचे 10 वे गुरू गुरू गोविंद सिंग यांचा जन्म 22 डिसेंबर 166 रोजी पटना येथे झाला. गुरु गोविंद सिंग हे शीख धर्माचे दहावे आणि शेवटचे गुरू होते. गुरू गोविंद सिंग यांनी शीख धर्मासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. 1699 मध्ये त्यांनी खालसा या शीख योद्धा समुदायाची स्थापना केली. त्यांनी महत्त्वाचे ग्रंथही लिहिले आणि शीख धर्माच्या पाच क्षांचा परिचय करून दिला.
1851 : भारतात पहिली मालगाडी धावली
भारतात पहिली मालगाडी धावली. ही गाडी उत्तराखंडच्या रुरकी येथून चालवली जात होती. इंजिनला आग लागल्यानंतर ही लाइन बंद झाल्यानंतर ही गाडी 9 महिने कार्यरत राहिली. थॉमसन वरून जेन्नी लिंडमध्ये पहिल्या इंजिनचे नाव बदलले गेले.
1887: गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म
भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा आज जन्म दिन होते. त्यांना शुद्ध गणिताचे जवळजवळ कोणतेही औपचारिक प्रशिक्षण मिळालेले नसतानाही त्यांनी गणितीय विश्लेषण, संख्या सिद्धांत, अनंत मालिका आणि सतत अपूर्णांक यामध्ये भरीव योगदान दिले. तसेच त्यांच्या काळातील न सुटलेल्या गणितांच्या समस्यांवर देखील त्यांनी उत्तरे शोधली. रामानुजन यांनी सुरुवातीला स्वतःचे गणितीय संशोधन एकाकीपणे विकसित केले.
रामानुजन यांनी आपल्या लहान आयुष्यामध्ये स्वतंत्रपणे सुमारे ३,९०० निकाल संकलित केले; ज्यामध्ये बहुतेक अविकारक (आयडेंटिटी) आणि समीकरणे आहेत. यापैकी अनेक पूर्णतः नाविन्यपूर्ण होते; रामानुजन प्राइम, रामानुजन थीटा फंक्शन, विभाजन फॉर्म्युले आणि मॉक थीटा फंक्शन्स सारख्या त्यांच्या मूळ आणि अत्यंत अपारंपरिक परिणामांनी गणितामध्ये संपूर्ण नवीन क्षेत्रे उघडली आणि पुढील संशोधनासाठी मोठ्या प्रमाणावर प्रेरणा दिली.
रामानुजन हे रॉयल सोसायटीचे सर्वात तरुण फेलो बनले, जे फक्त दुसरे भारतीय सदस्य होते आणि ट्रिनिटी कॉलेज, केंब्रिजचे फेलो म्हणून निवडले जाणारे पहिले भारतीय बनले. रामानुजनची तुलना यूलर आणि जेकोबी सारख्या गणितज्ञांसोबत होते. वयाच्या 32 व्या वर्षी त्यांचे 1920 मध्ये निधन झाले.
2012 मध्ये भारताचे तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी मद्रास विद्यापीठात रामानुजन यांच्या 125 व्या जयंती कार्यक्रमादरम्यान 22 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची घोषणा केली.
1945 : लावणी लेखक श्रीधर कृष्णाजी कुलकर्णी तथा पठ्ठे बापूराव यांचे निधन
बापूराव ब्राह्मण असून त्यांच्याकडे कुलकर्णीपणाची वृत्ती होती. परंतु तमाशाच्या आवडीमुळे त्यांचा व्यवसाय आणि संसार त्यांनी सोडून दिला. स्वतःचा फड उभारून त्यात स्वरचित लावण्या आणि कवने पठ्ठे बापूराव ह्या नावाने म्हणू लागले. पठ्ठे बापूरावांनी गण, गौळण, भेदिक, झगड्याच्या, रंगबाजीच्या, वगाच्या आदी विपुल लावण्या रचिल्या. त्यांतील काही तीन भागांत प्रसिद्ध झाल्या आहेत. मात्र, त्यांची बरीचशी रचना आजही अनुपलब्ध आहे. बहुतेक तमाशांत पठ्ठे बापूरावांच्या लावण्या गायिल्या जातात. तमाशा कलाकारांमध्ये आदरांचे स्थान आहे.
2011 : भारतीय क्रिकेटपटू वसंत रांजणे यांचे निधन
वसंत रांजणे यांचा जन्म पुण्यात 22 जुलै 1937 रोजी झाला. वेगवान गोलंदाजांपेक्षा फिरकी गोलंदाजीला खेळपट्ट्या अनुकूल असण्याच्या काळात त्यांनी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. भारताकडून ते 1958 ते 64 दरम्यान सात कसोटी सामने खेळले. त्यात त्यांनी 34.15 च्या सरासरीने 19 विकेट्स घेतल्या. वेस्ट इंडिजविरुद्ध कानपूर येथे 12 डिसेंबर 1958 मध्ये त्यांनी कसोटीत पदार्पण केले. शेवटचा कसोटी सामना ते 1964 मध्ये चेन्नईत ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळले. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजच्या अव्वल खेळाडूंविरुद्ध त्यांनी अचूक गोलंदाजी केली. प्रथम श्रेणी सामन्यात त्यांनी महाराष्ट्र आणि रेल्वेकडून खेळताना आपला दबदबा राखला. 22 डिसेंबर 2011 रोजी त्यांचे दीर्घ आजाराने निधन झाले.
इतर महत्त्वाच्या घटना
1853: भारतीय तत्त्वज्ञ सरदादेवी यांचा जन्म
1885: सामुराई इटो हिरोबुमी जपानचे पहिले पंतप्रधान झाले.
1921: भारतातील विश्वभारती विद्यापीठ सुरु झाले.
2002: प्रायोगिक व व्यावसायिक रंगभूमीवरील चतुरस्त्र अभिनेते दिलीप कुळकर्णी यांचे निधन