20 March Headlines :  राज्यातील शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याने आजपासून कार्यालयात लोकांची गर्दी होणार आहे. तर, अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या कामात वेग येण्याची शक्यता आहे. विधिमंडळ अधिवेशनात आजही सत्ताधारी-विरोधकांमध्ये खडाजंगी होण्याची शक्यता आहे. तर, पुण्यात ओशोंच्या आश्रमासमोर ओशो अनुयायांकडून ओशो कम्युन विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. जाणून घेऊयात आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी...


 
दिल्ली 


- महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे भवितव्य ठरवणाऱ्या याचिकेवर आज सुनावणी होण्याची शक्यता आहे. आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ही सुनावणी पार पडण्याची शक्यता आहे. मागील काही महिन्यांपासून ही सुनावणी विविध कारणांनी लांबणीवर गेली आहे. 


- संसदेत मध्ये कॉग्रेस आदानी प्रकरणावरून आणि भाजप राहुल गांधीनी माफी मागावी म्हणुन आक्रमक असल्यामुळे सभागृहाच कामकाज होत नाहीये. यावर तोडगा निघण्याची शक्यता कमी आहे. अशातच अधिवेशन मुदतपुर्वी गुंडाळलं जाण्याची चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या दालनात विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक होणार आहे. 


 


मुंबई 


- विधिमंडळ अधिवेशनात आजही सत्ताधारी-विरोधकांमध्ये विविध मुद्यांवरून खडाजंगी होण्याची शक्यता आहे. मुंबईच्या विकासाच्या मुद्यावरून चर्चा सुरू आहे. विधान परिषदेत मुख्यमंत्री या चर्चेला उत्तर देण्याची शक्यता आहे.


- वादग्रस्त क्रिकेट बुकी अनिल जयसिंघानी आणि त्याची मुलगी अनिक्षा यांना आज सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे. मुंबई पोलिसांनी काल अनिल जयसिंघानी याला गुजरातमधून अटक केली आहे. 


- महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसकडून वाढती महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्याच्या शेतीमालाला हमीभाव, अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचा झालेला अतोनात नुकसान त्याचे पंचनामे लवकरात लवकर करून शेतकऱ्यांना भरीव अशी मदत झाली पाहिजे आदी मागण्यांसाठी विधानसभेला घेराव आंदोलन होणार आहे. युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत आणि मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष आमदार झिशान सिद्दिकी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी बी. व्ही. श्रीनिवास, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, भाई जगताप, नितीन राऊत, यशोमती ठाकूर, सुनील केदार, विश्वजीत कदम, प्रदेश प्रभारी मिथेंद्र सिंग आदी उपस्थित राहणार आहेत. 


- हसन मुश्रीफ यांची तिन्ही मुलं आणि त्यांचा सीए यांनी ईडीच्या केसमध्ये अटक टाळण्यासाठी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीनावर मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. 


- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत काही महत्वाचे पक्षप्रवेश होणार आहेत. 


- भाजपा आमदार नितेश राणे यांची लव्ह जिहादवर पत्रकार परिषद घेणार आहेत. 


- परप्रांतीय मासेविक्री करणाऱ्यांच्या विरोधात भांडुपमध्ये स्थानिक मासे विक्रेत्यांचे आंदोलन होणार आहे. महापालिकेच्या एस विभागासमोर मासेविक्री करुन करणार निषेध आंदोलन करणार आहेत. 
 


 पुणे 


- ओशोंच्या अनुयायांचे ओशो कम्युन समोर आंदोलन करणार आहेत. ओशो कम्युनची मालकी कोणाची यावरुन वाद सुरु आहे. ओशो कम्युनवर परदेशी लोकांनी ताबा मिळवलाय, असा अनुयायांचा आरोप आरोप आहे. न्यायालयात देखील हा वाद सुरु आहे. आज ओशोंचा संबोधी दिवस आहे.


 
नाशिक 


-  सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मिटल्याने शेतकऱ्यांना दिलासा नाशिक जिल्ह्यातील शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे आजपासून सुरू होणार आहेत. अधिकारी कर्मचारी आजपासून बांधावर जाणार आहेत.


-  गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने आनंदाच्या शिधाचे वाटप केले जाणार असून पुरवठा विभागाने दिलेल्या सूचनेनूसार आनंद शिधाचे स्टिकर रेशन दुकांनामध्ये आज लावले जाणार आहेत. 


 
अहमदनगर 


- सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याने आज सरकारी कार्यालयात नागरिकांची विविध कामांसाठी गर्दी होण्याची शक्यता आहे.


 
जळगाव 


-  महापालिकेची आज महासभा होणार आहे. पालिकेत सध्या महापौर ठाकरे गटाचे आहे तर बहुमत भाजप शिंदे गटाचे असल्याने काही ठरावावरून खडाजंगी होण्याची शक्यता आहे.


-  जळगाव शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा हलविल्या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्यात यावी यासाठी सर्व पक्षीय मोर्चा काढण्यात येणार आहे.


धाराशिव


-  उद्धव ठाकरे गटाचे नेते, माजी खासदार चंद्रकांत खैरे आज धाराशिव दौऱ्यावर आहेत.  सकाळी तुळजापूरच्या तुळजाभवानीचे दर्शन करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.


 
नागपूर 


- जी 20 परिषदेचं आज संध्याकाळी समारोप होणार असून त्यापूर्वी दिवसभरात तीन सत्रांमध्ये विविध विषयांवर मंथन होणार आहे. दुपारी 4.30 वाजता. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या समारोप समारंभात उपस्थित राहण्याची शक्यता आहे.



यवतमाळ 


- राज्य मध्यवर्ती संघटने कडून संप माघार घेतल्याची घोषणा करण्यात आली. मात्र अधिकृत कुठलीही पत्र न आल्याने आज यवतमाळ जिल्ह्यात कर्मचाऱ्यांकडून जुन्या पेन्शनच्या योजनेसाठी मोर्चा निघणार आहे.


 
अमरावती 


- गुढीपाडव्यानिमित्त अमरावती शहरात आज मातृशक्ती महारॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. 



भंडारा 


- दिल्ली इथून 100 बायकर्स भंडारा इथं पोहचले आहेत. भंडारा जिल्ह्यातील कोब्रा बटालियन इथं मंगळवारी शालेय विद्यार्थ्यांशी बायकर्स हितगुज साधणार आहेत. यावेळी शस्त्र प्रदर्शन आयोजित करण्यात आली आहे.