मुंबई : अनेक चांगल्या वाईट घटनांनी इतिहासातील तारखा नोंदलेल्या (Today History) असतात. आज म्हणजे 20 जानेवारी रोजी इतिहासात अनेक महत्वाच्या घटना घडल्या होत्या. आजच्याच दिवशी भारताचे माजी रेल्वे मंत्री अर्थतज्ञ प्रा. मधू दंडवते यांचा जन्म आजच्याच दिवशी झालेला. क्रांतिकारक हेमू कलाणी यांना ब्रिटिशांनी फाशी दिली. त्यांचा जन्म 23 मार्च 1923 रोजी झाला होता.  बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांचा जन्मही आजच्याच दिवशी झालेला. याशिवाय आजच्या दिवशी इतिहासात कोणकोणत्या महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या यांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.


राष्ट्रीय आलिंगन दिन (National Hug Day)


आज राष्ट्रीय आलिंगन दिन (National Hug Day) आहे. कॅनडा, जर्मनी, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये देखील 21 जानेवारी रोजी राष्ट्रीय आलिंगन दिवस साजरा केला जातो. 
 


1924 : प्रा. मधू दंडवते यांचा जन्म (Madhu Dandwate Birth Anniversary)


भारताचे माजी रेल्वे मंत्री अर्थतज्ञ प्रा. मधू दंडवते यांचा जन्म 21 जानेवारी 1924 रोजी झाला.  ते महाराष्ट्र विधानपरिषदेचे देखील सदस्य होते.  रेल्वेच्या सेकंडक्लासच्या डब्यातल्या बर्थलाही कम्फर्टेबल कुशन्स असावेत हे भौतिकशास्त्राच्या माणसालाच नेमकं कळू शकतं. कुशन्सची डेंसिटी आणि शरीराला मिळणारा आराम यातला संबंध भौतिकशास्त्र तुम्हाला नक्कीच लक्षात आणून देतं. त्यांचा मृत्यू 12 नोव्हेंबर 2005 रोजी झाला. 


1943 : क्रांतिकारक हेमू कलाणी यांना ब्रिटिशांनी फाशी दिली


1943 : क्रांतिकारक हेमू कलाणी यांना ब्रिटिशांनी फाशी दिली. त्यांचा जन्म 23 मार्च 1923 रोजी झाला होता.  1942 मध्ये महात्मा गांधींनी भारत छोडो आंदोलन सुरू केले तेव्हा हेमू कलाणी यांनी त्यात उडी घेतली. 1942 मध्ये त्यांना गुप्त माहिती मिळाली की ब्रिटीश सैन्याच्या शस्त्रास्त्रांनी भरलेली ट्रेन रोहरी शहरातून जाणार आहे. हेमू कलानींसह त्यांच्या साथीदारांनी रेल्वे रुळ विस्कळीत करण्याचा डाव आखला. हे सर्व काम ते अतिशय गुप्तपणे करत होते, पण तरीही तेथे तैनात असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी त्यांना पाहिले आणि हेमू कलानींना अटक केली आणि त्यांचे बाकीचे साथीदार पळून गेले. त्यानंतर हेमू कलाणी यांना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. त्यावेळी त्यांचं वय अवघं 19 वर्ष होतं.


1958 : कॉपीराईटचा नियम आजच्या दिवशीच लागू केला  


भारत सरकारकडून कॉपीराईटचा नियम आजच्या दिवशीच लागू केला गेला. भारतीय कॉपीराइट कायदा 1957 चा उद्देश व्यावसायिकतेला प्रोत्साहन देणे हा नव्हता तर लेखक, प्रकाशक आणि ग्राहक यांच्या हितासाठी योग्य संतुलन स्थापित करणे हा होता. संगणक, इंटरनेट इत्यादी तांत्रिक माध्यमांच्या या युगात लेखक आणि प्रकाशकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी, भारत सरकारने त्यात सुधारणा करण्यासाठी कॉपीराइट हक्क दुरुस्ती विधेयक 2010 आणण्याचा निर्णय घेतला.


1986:  अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा जन्म  (Sushant Singh Rajput Birth Anniversary)


बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा आज जन्मदिवस. सुशांतनं आपल्या करिअरची सुरुवात टेलिव्हिजन मालिकांमधून केली होती. त्याचा पहिला शो स्टार प्लसचा रोमँटिक नाटक "किस देश में है मेरा दिल" (2008), त्यानंतर झी टीव्हीच्या लोकप्रिय शो पवित्र रिश्ता (2009-11) मध्ये त्याची प्रमुख भूमिका होती. त्याने 2013 मध्ये 'काय पो चे' या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर शुद्ध देसी रोमान्स, पीके, डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी या चित्रपटात काम केले. 2016 च्या M.S. Dhoni: The Untold Story या चित्रपटात त्याने महेंद्रसिंह धोनीची मुख्य भूमिका साकारली होती.  14 जून 2020 रोजी सुशांत सिंह राजपूतचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला होता, ज्याचा तपास अद्याप सुरुच आहे.


इतर महत्वाच्या घटना आणि घडामोडी


1761 : आजच्याच दिवशी थोरले माधवराव पेशवे यांनी वयाच्या 16व्या वर्षी पेशवाईची सूत्रे हाती घेतली.
1805 : होळकर व जाट सैन्याने भरलपूर येथे इंग्रजांचा पराभव केला.
1882 :   कादंबरीकार, साहित्य समीक्षक आणि तत्त्वचिंतक  वामन मल्हार जोशी यांचा जन्म आजच्याच दिवशी झालेला. त्यांचा मृत्यू 20 जुलै 1943 रोजी झाला.
1894 : माधव त्र्यंबक पटवर्धन उर्फ 'माधव जूलियन' यांचा जन्म आजच्याच दिवशी झालेला. ते   कवी, कोशकार, छंदशास्त्राचे व्यासंगी आणि मराठी भाषाशुद्धीचे तत्त्वनिष्ठ पुरस्कर्ते होते.  
1910 : चित्रपट दिग्दर्शक, लेखक, कवी व गीतकार  शांताराम आठवले यांटा जन्म. भाग्यरेखा, वहिनीच्या बांगड्या, शेवग्याच्या शेंगा अशा अनेक चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले होते. 
1972 : मणिपूर आणि मेघालय यांना राज्याचा दर्जा मिळाला.
2000 : 'फायर अँड फरगेट; या रणगाडाविरोधी अत्याधुनिक क्षेपणास्त्र यंत्रणेची भारताने यशस्वी चाचणी घेतली.