मुंबई : आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या दावोस दौऱ्यावर टीकास्त्र सोडलं होतं. उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मुख्यमंत्र्यांसोबत गेलेल्या लोकांची संख्या आणि खर्च मांडला होता. यावर आता उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिलेय. मुख्यमंत्रीपद गेलेय, हे आता स्विकारायला हवं, असा टोला लगावत सामंतांनी दावोस दौऱ्यातला सगळा खर्च सांगितला. तसेच महाविकासआघाडीच्या सरकारवेळी झालेला खर्च, छायाचित्रे मुख्यमंत्र्यांना दिल्याचेही त्यांनी यावेळी सांगितलं.


दोवोस येथील जागतिक आर्थिक परिषद 2024 साठी आम्ही मुख्यमंत्र्यांसोबत गेलो होतो. हा दौरा यशस्वी झाला. 3 लाख 72 हजारांचे सामंज्यस्य करार या दौऱ्यात झाले. प्रत्येक करार करताना संबधित कंपनीचे संचालक तेथे उपस्थित होते. त्यांनी आणखी दीड लाखाचे करार आम्ही करू असे आश्वसन दिले आहे. अनेक कंपन्यांना आम्ही दाओसला जाण्यापूर्वीचं जागा दिलेली आहे. नुसते आश्वासन देण्यासाठी किंवा थंड हवेसाठी आम्ही गेलो नाही. मात्र काही लोकं थंड हवेच्या ठिकाणी जाऊ न शकल्याने पोटशूळ उठलेले आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला. 


सामंतांनी खर्च मांडला 


दावोस दौऱ्यातील पॅव्हेलियनचं भाडं 4 कोटी 72 लाख रुपये इतके आहे. राज्याच्या शिष्ठ मंडळाचा प्रवास व विमा 74 लाख रुपयांचा आहे. त्याशिवाय इतर खर्चही यावेळी त्यांनी मांडला. 


निवासस्थान 2 कोटी 86 लाख
वाहन खर्च 1 कोटी 74 हजार
आदरातिथ्य जेवण 1 कोटी 23 लाख
सुरक्षा रक्षक 29 लाख 76 हजार
फोटो ग्राफर 18 लाख 86 हजार
दैनिक भत्ता 3 लाख 80 हजार  
पब्लिक सिटी एजन्सी 1 कोटी
बॅनर 6 लाख 78 हजार
फन्नचर 12 लाख 96 हजार
भेट वस्तू गणपतीची मूर्ती 2 कोटी 6 लाख
प्रवेश पत्र 58 हजार


MMRDA मधील पाच अथवा इतर व्यक्ती स्वत:च्या खर्चाने दावोसला आले होते.  यावेळी कटाक्षाने शासनाचे पैसे वाचले पाहिजे ह्या सूचना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्याकडून होत्या. जे करार झाले त्याचा पुरावा दिला आहे. कुठली कंपनी कितीची गुंतवणूक केली? किती रोजगार? हा सर्व खर्च दिलेला आहे. 


जे स्वत: च्या खर्चाने गेलेत त्यांच्यावर आक्षेप घेण्याचं कारण नाही 


जे खासदार दावोस दौऱ्यावर गेले होते त्यांना विशेष अधिकार लोकसभेने दिले होते. तसेच अन्यजण जे स्वत:च्या खर्चाने गेले त्यांच्यावर आक्षेप घेण्याचं कारण नाही. कोण कोण मुख्यमंत्र्यांना भेटलं याचे फोटोही दिलेत. काही जण आता शिंदेंना बदनाम करण्यासाठी काम करतायत. पण इतिहासातील सर्वाधिक गुंतवणूक आलीये. त्यामुळे आता मुख्यमंत्री शिंदेंना मिळणाऱ्या प्रसिद्धीमुळे पोटशूळ उटलाय, असंही सामंत म्हणालेत. 


50 हजार कोटीचा उर्जा विभागाच्या प्रकल्पाचे कागद सापडत नाहीत 


टिका करणाऱ्यांनी 50 हजार कोटीचा उर्जा विभागाचा प्रकल्प आला होता. त्याचा आता कागदही सापडत नाहीये, असं म्हणत उदय सामंत यांनी विरोधकांवर निशाणा साधला. पुढे त्यांनी म्हटलं की, FDI असलेले प्रकल्प आम्ही महाराष्ट्रात आणलेत. तसेच इतर प्रकल्प आम्ही सही केलेले नाहीत, त्याचेही पुरावे आम्ही देऊ. मॅग्नेटिक महाराष्ट्रात देखील रेकॉर्डब्रेक गुंतवणूक आणता येईल, टीका करणाऱ्यांनी त्याची वाट पाहावी. 


मुख्यमंत्री पद आता गेलंय हे स्विकारायला हवं, उद्धव ठाकरेंवर निशाणा


उद्धव ठाकरे यांनी आता मुख्यमंत्री पद गेलंय हे स्विकारायला हवं, असं म्हणत उदय सामंत यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. अनिल देशमुख यांनी उद्योग विभागाबाबत बोलू नये, त्यांचा आजही मी आदर करतो. ते गृहमंत्री असताना सचिन वाजे सारख्या व्यक्तीला प्रशासनात आणून 100 टक्के वसूलीचे उद्योग केलेत. त्यामुळे त्यांनी यावर बोलू नये, असं म्हणत उदय सामंत यांनी अनिल देशमुखांवर निशाणा साधला. 


हेही वाचा : 


Sanjay Raut : "ठाकरे कुटुंबाला अशी वागणूक देताय, प्रभू रामचंद्र तुम्हाला शाप देतील"; संजय राऊतांचा टीकेचा बाण