Baramati News : आतापर्यंत लहान मुलांनी नाणी, गोट्या, खिळा, पिना अशा वस्तू गिळल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मात्र बारामतीत राहणाऱ्या एका 18 महिन्याच्या चिमुरड्याने गिळलेली वस्तू ऐकून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल, 18 महिन्यांच्या बालकाने अनावधानाने चाव्यांचा जुडगा गिळल्याचा धक्कादायक प्रकार भिगवणमध्ये घडला. काय घडले नेमके?


डॉक्टरांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखले


आरुष अतुल गुणवरे (वय 18 महिने)  असे या बालकाचे नाव आहे. 18 महिन्यांच्या बालकाने अनावधानाने चाव्यांचा जुडगा गिळल्याचा प्रकार भिगवणमध्ये घडला. चाव्यांचा जुडगा गिळल्यानंतर आरुषला प्रथम भिगवण येथील दवाखान्यात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी बारामतीला नेण्याचा सल्ला दिला. आरुषला बारामतीतील श्रीपाल रुग्णालयात आणण्यात आले. आरुषला रुग्णालयात आणल्यावर त्याच्या तोंडातून रक्त आणि लाळ बाहेर येत होती. त्याचा जीव गुदमरण्यास सुरवात झाली होती. डॉक्टर मुथा यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखत तातडीने उपचार सुरु केले.  त्याने गिळलेला चाव्यांचा जुडगा नाकाच्या मागे श्वासनलिकेच्या वरील बाजुस अडकल्याचे तपासणीत दिसुन आले. 


अवघ्या अर्ध्या तासात ‘ब्रॉन्कोस्कोपी’
त्यानंतर डॉ. मुथा यांनी तातडीने कान नाक घशाचे डॉ. वैभव मदने, भुलतज्ञ डॉ.अमर पवार यांना संपर्क साधत हा प्रकार सांगितला. त्यानंतर दोघे डॉक्टर रुग्णालयात पोहचले. आरुषला भुल देत दुर्बिणीद्वारे ‘ब्रॉन्कोस्कोपी’ करीत चाव्यांचा जुडगा काढण्यात आला. अवघ्या अर्ध्या तासात डॉक्टरांनी यशस्वी उपचार दिल्याने आरुषला जीवदान मिळाले. डॉ राजेंद्र मुथा यांनी लहान मुलांची विशेष काळजी घेण्याचा सल्ला पालकांना दिला आहे. तसेच लहान मुलांपासुन लोखंडी, टोकदार वस्तू, केमिकल, औषधे, आदी दूर ठेवण्याचे आवाहन केले आहे.


नाणं गिळलेल्या चिमुरड्याला जीवदान


अशीच एक घटना शहापूरलाही घडली होती, आठ वर्षांच्या मुलाने खेळता-खेळता एक रुपयाचे नाणे गिळले होते. स्थानिक रुग्णालयांत एंडोस्कोप नसल्याचं कारण देत त्याच्यावर ऑपरेशन करण्यास डॉक्टरांनी असमर्थता दाखवली होती. कॉईन अन्ननलिकेत अडकल्याने जवळपास बारा तासापासून चिमुरडा अन्न-पाण्यावाचून होता. त्यामुळे त्याच्या जीवितालाही धोका निर्माण झाला होता.


धोका पत्करून नाणे काढले


कोरोना संसर्गामुळे लॉकडडाऊन प्रोटोकॉलनुसार शस्त्रक्रिया करण्यापूर्वी रुग्णाची कोव्हीड चाचणी घेण्यात आली होती, मात्र चिमुकला बारा तासांपेक्षा अधिक काळ उपाशीपोटी असल्याने अहवाल येण्यापूर्वीच शस्त्रक्रिया करणे भाग होते. अखेर कोरोनाचा धोका पत्करुन चार ते पाच डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली आणि आठ वर्षांच्या मुलाने गिळलेले एक रुपयाचे नाणे अन्ननलिकेतून बाहेर काढले.


हे देखील वाचा-


CM Uddhav Thackeray : राज्यपाल, मद्यराष्ट्राचा विरोध ते दाऊदबाबत काय म्हणाले मुख्यमंत्री? जाणून घ्या भाषणातील 10 मुद्दे


CM Uddhav Thackeray : "देशात सर्वात कमी मद्यविक्रीची दुकानं महाराष्ट्रात, राज्याला मद्यराष्ट्र म्हणून बदनाम करू नका"


IPS पासून कॉन्स्टेबलपर्यंत, बदल्यांमध्ये मोठा भ्रष्टाचार, शिवसेना आमदारानं सभागृहातच सांगितलं!