15 March Headlines :  सुप्रिम कोर्टात सुरू असलेल्या सत्ता संघर्षाच्या सुनावणीचा आज दुसरा दिवस आहे.  होळीच्या सुट्टीनंतर कालपासून पुन्हा एकदा सलग सुनावणीला सुरुवात झाली आहे. याबरोबरच जुन्या पेन्शनसह विविध मागण्यासांसाठी सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. या संपाचा आ दुसरा दिवस आहे. 


सत्ता संघर्ष सुनावणीचा दुसरा दिवस  


सुप्रिम कोर्टात सुरू असलेल्या सत्ता संघर्षाच्या सुनावणीचा आज दुसरा दिवस आहे.  होळीच्या सुट्टीनंतर कालपासून पुन्हा एकदा सलग सुनावणीला सुरुवात झाली आहे.  शिंदे गटाकडून यावेळी युक्तिवाद सुरू असून राज्यपालांनी घेतलेली भूमिका कशी योग्य होती, तसंच आमदारांच्या अपात्रतेबाबत कोर्ट हस्तक्षेप करू शकत नाही यावर आपली भूमिका मांडत आहेत.  महाराष्ट्रातील राजकीय गुंतागुंतीचं हे प्रकरण फक्त राज्यासाठीच नव्हे, तर देशासाठी दिशादर्शक असल्याचं म्हटलं जात आहे.   


सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा दुसरा दिवस 


जुन्या पेन्शनसह विविध मागण्यासांसाठी सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. या संपाचा आ दुसरा दिवस आहे. जुन्या पेंशन योजनेसाठी राज्यातील 19 लाख सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी कालपासून बेमुदत संपावर आहेत. 
 
लाल वादळ मुंबईच्या दिशेने


विविध मागण्यांसाठी माकप, किसान सभेच्या वतीनं सुरू असलेला मोर्चा मुंबईच्या दिशेने येत आहे. आंदोलकांच्या मागण्यांवार आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री बैठक घेणार आहेत.  या बैठकीत आठ खात्याचे मंत्री आणि अधिकारी उपस्थित असणार आहेत. बैठकीत सकारात्मक निर्णय झाला नाही तर आंदोलन सुरूच ठेवण्याची मोर्चेकऱ्यांची भुमिका आहे.


विधीमंडळ अधिवेशन
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. त्यात जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारलाय.  काही संघटनांनी या संपातून माघार घेतली तर काही संघटना आपल्या भूमिकेवरती अजूनही ठाम आहेत. आज यावरती काही निर्णय सभागृहात होतोय का? यावरून सभागृहातही मोठ्या प्रमाणावर गोंधळ होण्याची शक्यता आहे. 
 
हसन मुश्रीफ आज पुन्हा ईडी कार्यालयात हजर राहणार
 
राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांना आज पुन्हा ईडी कार्यालयात हजर रहावे लागणार आहे. उच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिल्यानंतर मुश्रीफ काल ईडी कार्यालयात चौकशीसाठी गेले होते. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी 2021 साली आरोप केले होते की माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपल्या कुटुंबातील सदस्य आणि विविध कंपन्यांच्या माध्यमातून बेहिशोबी मालमत्ता जमवली आहे.  
 
साईनाथ दुर्गेची पोलिस कोठडी संपणार 
 
शितल म्हात्रे वायरल व्हीडीओ प्रकरणी साईनाथ दुर्गेला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. त्याला दिलेली एक दिवसाची पोलिस कोठडी आज संपत आहे. आज कोर्टात हजर केलं जाणार आहे.
 
ईपीएस 95 राष्ट्रीय संघर्ष समितीच्या वतीने नगर-पुणे रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन  
 
जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी ईपीएस 95 राष्ट्रीय संघर्ष समितीच्या वतीने नगर-पुणे रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन केले जाणार आहे. दरमहा साडेसात हजार रुपये पेन्शन आणि महागाई भत्ता लागू करण्यात यावा, पती-पत्नीस मोफत वैद्यकीय सेवा मिळावी या आणि अशा इतर मागण्या साठी या आंदोलन केले जाणार असल्याची माहिती संघटनेचे शहराध्यक्ष संजय मनोत यांनी सांगितले आहे. 
 
महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील पदाधिकाऱ्यांची बैठक


महाविकास आघाडीच्या संयुक्त सभा बाबत चर्चा करण्यासाठी घटक पक्षातील पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. या बैठकीसाठी राज्यभरातील तिन्ही पक्षाचे पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, जिल्हाप्रमुख, संपर्क प्रमुख यांना निमंत्रित करण्यात आलं आहे. या बैठकीला ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, अजित पवार, नाना पटोले, जयंत पाटील उपस्थित राहणार आहेत. 


 राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्यावतीने आझाद मैदानावर आंदोलन
राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्यावतीने बंद एनटीसी गिरणी कामगारांच्या प्रश्नावर आझाद मैदानावर आंदोलन करण्यात येणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचा घराच्या मुद्द्यासह विविध मागण्या मांडत आहेत. मात्र त्याकडे लक्ष दिले जात नाही. या सरकारने तरी लक्ष द्यावं या उद्देशाने पुन्हा लक्षणिक आंदोलन करणार आहेत.  
 
 पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊतांचा जामीन रद्द करण्यासाठी ईडीनं दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी


 पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊतांचा जामीन रद्द करण्यासाठी ईडीनं दाखल केलेल्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी आहे. दिलेला जामीन रद्द करत सत्र न्यायालयाच्या निकालातील काही निरीक्षणं काढून टाकण्याची ईडीची हायकोर्टाकडे विनंती.