दिल्ली 


- बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आज दुपारी 12 वाजता सीताराम येचुरींसह डाव्या नेत्यांची भेट घेणार आहेत.
 
- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जम्मू काश्मीरच्या सुरक्षा स्थितीचा आढावा घेणार आहेत. 
 
- अयोध्या – राम जन्मभुमी स्थायी सुरक्षा समितीची आज बैठक होणार आहे. या बैठकीत निर्माणाधीन राम जन्मभूमीची सुरक्षा आणि भाविकांची सुरक्षा या विषयावर चर्चा होणार आहे. 
 


मुंबई


- केंद्र सरकारच्या रोजगार मेळावा अंतर्गत विविध पदांसाठी नियुक्त झालेल्या तरुणांना नियुक्ती पत्र देण्यात येणार आहेत. पंतप्रधान व्हीडीओ कॉन्फ्रसिंगच्या माध्यमातून उपस्थित असणार तर केंद्रीय मंत्री नारायण राणे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे उपस्थित असणार आहेत. 71 हजार नवनियुक्त कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्रक दिली जाणार आहेत. 


- हसन मुश्रीफांची अटकपूर्व जामीनासाठी हायकोर्टात धाव. मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए कोर्टानं जामीन फेटाळलच्या निर्णयाला दिलं आव्हान आज होणार तातडीची सुनावणी 


-  बॉम्बे चेंबर्स ऑफ कॉमर्सकडून 11 व्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यात गिरीष कुबेर हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मुलाखत घेणार आहेत. संपूर्ण दिवसभर चालणाऱ्या या परिषदेला राज्यातील चार मंत्र्यांची उपस्थिती असणार आहे. 


- राज्यभरातील कुपोषणाच्या गंभीर समस्येबाबत दाखल विविध जनहित याचिकांवर सुनावणी. गेली वर्षानुवर्ष ही समस्या राज्यात कायम असून राज्य सरकार ठोस उपक्रम राबवत नसल्याबद्दल हायकोर्टानं व्यक्त केलीय वेळोवेळी नाराजी



पुणे 


- पिंपरीमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्त UPSC आणि MPSC चे विद्यार्थी सलग 18 तास अभ्यास अभियान राबवणार आहेत.


- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत


- पालकमंत्री चंद्रकांत पाटील शिरुर तालुक्याच्या दौऱ्यावर



अकोला/वाशिम 


– रिसोड येथील सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संबोधित करणार
 
 


परभणी 


- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 132 व्या जयंतीनिमित्त 55 हजार चौरस फुटाची रांगोळीचे उद्घाटन



बीड 


- अवकाळीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते आंबादास दानवे बीडच्या बेलखंडी आणि केजच्या बोरगाव येथे पाहणी करणार. 
 


नागपूर 


- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा 110 व्या समारंभासाठी राज्यपाल रमेश बैस दीक्षांत समारंभाला उपस्थित राहणार आहेत, दुपारी 2 वाजता.


चंद्रपूर 


- बहुजन समता पर्वात आज छगन भुजबळ आणि जितेंद्र आव्हाड सहभागी होणार आहेत. 


ठाणे 


- उद्योग मंत्री उदय सामंत यांची ठाण्यात पत्रकार परिषद, सकाळी 11.30 वाजता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवन चरित्र ग्रंथाचे प्रकाशन होणार आहे. त्यासंदर्भात माहिती देणार आहेत.