11th March Headlines : चंद्रपुरात यंदा पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. या फिल्म फेस्टिवलचे आज उद्घाटन होणार आहे. याबरोबरच महाराष्ट्र राज्य असोसिएशन आणि जळगाव जिल्हा कबड्डी असोशिएशनतर्फे 21 व्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा शुभारंभ मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते केला जाणार आहे. 



स्व.किशनलालजी प्रेमचंदजी काठोटीवाले ( बडे पहेलवान) यांच्या स्मृतिद्वाराचे लोकार्पण



जालना येथे स्व.किशनलालजी प्रेमचंदजी काठोटीवाले ( बडे पहेलवान) यांच्या स्मृतिद्वाराचे लोकार्पण विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आंबादास दानव यांच्या हस्ते होणार आहे. 


नाशिकमध्ये आज रहाडीचे पूजन


नाशिकची पेशवेकालीन रहाडी मधील रंगपंचमी रविवारी साजरी होणार आहे... आज रहाडीचे पूजन, साफसफाई रंगपंचमीची तयारी केली जाणार आहे. 


 जळगाव जिल्हा कबड्डी असोशिएशनतर्फे 21 व्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा शुभारंभ


महाराष्ट्र राज्य असोसिएशन आणि जळगाव जिल्हा कबड्डी असोशिएशनतर्फे 21 व्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा शुभारंभ मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते केला जाणार आहे...  सायंकाळी 5 वाजता जळगाव शहरातील सागर पार्क येथे हा शुभारंभ होईल


राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर


राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. ते पूर्वपट्ट्यातील पाणीटंचाई संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेणार आहेत.


नागपूरमध्ये करुणा त्रिपदीचे सामूहिक गायन 


शालेय विद्यार्थी करणार करुणा त्रिपदीचे सामूहिक गायन..  श्री गुरु मंदिर परिवारातर्फे सकाळी 8 वाजता करुणा त्रिपदीचे सामूहिक गायन रेशीम बाग परिसरातील भट सभागृहात आयोजित करण्यात आले आहे... या उपक्रमात नागपुरातील विविध शाळांमधील शेकडो विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभागी होणार आहेत


चंद्रपुरात 35 वे 2 दिवसीय महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन


आजपासून चंद्रपुरात 35 वे 2 दिवसीय महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन होणार आहे… राज्यभरातून येणार पक्षिमित्रांची मांदियाळी... वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची कार्यक्रमाला उपस्थिती... जिल्ह्यातील ‘माळढोक’ व ‘सारस’ पक्षी संरक्षण व संवर्धनावर होणार चर्चा, भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 


 अमरावतीत दोन दिवसीय फगवा महोत्सवाच आयोजन


मेळघाटात पर्यटन संचालनालयातर्फे दोन दिवसीय फगवा महोत्सवाच आयोजन मेळघाटातील धारणी तालुक्यातील मौजे कोठा येथील ग्रामज्ञानपीठ बांबू केंद्र येथे करण्यात आले आहे. दुपारी 2 वाजता खासदार नवनीत राणा यांच्या हस्ते महोत्सवाचा शुभारंभ होईल...  मेळघाटातील आदिवासी संस्कृतीचे सौंदर्य जगासमोर आनणे हा या मागचा उद्देश आहे. आदिवासी बांधवांच्या नृत्य स्पर्धा, कोरकू संस्कृती दर्शन, नैसर्गिक रंग तयार करण्याची प्रात्यक्षिके, जंगल भ्रमण, जंगल सफारी असे अनेक ठळक उपक्रमांच आयोजिन करण्यात आले आहे. 


 पंतप्रधान  “पीएम विश्वकर्मा कौशल सन्मान- पीएम विकास” या विषयावरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारमध्ये मार्गदर्शन करणार 


पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 मार्च 2023 रोजी, “पीएम विश्वकर्मा कौशल सन्मान” पीएम विकास या योजनेबद्दल होणाऱ्या अर्थसंकल्पोत्तर वेबिनारमध्ये सकाळी 10 वाजता मार्गदर्शन करणार आहेत. अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या घोषणांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी संबंधित लोकांकडून सूचना, सल्ले आणि कल्पना जाणून घेण्यासाठी केंद्र सरकारने आयोजित केलेल्या 12 वेबिनार मालिकेपैकी हे एक वेबिनार असेल.“पीएम विश्वकर्मा कौशल सन्मान” म्हणजेच, पीएम विकास या योजनेचे उद्दिष्ट, कारागीर/कलाकाराना देशांतर्गत तसेच जागतिक पुरवठा साखळीशी जोडून देत, त्यांच्या  वस्तू/सेवा/उत्पादने यांची गुणवत्ता सुधारणे, त्यांची संख्या (प्रमाण) वाढवणे असे आहे.


या वेबिनार मध्ये चार चर्चात्मक सत्रे होणार असून त्यांच्या संकल्पना खालीलप्रमाणे असतील :
1.      रास्त दरात वित्तीय सेवा उपलब्ध करणे, यात डिजिटल व्यवहारांवर विशेष सवलत आणि सामाजिक सुरक्षा यांचा समावेश असेल.
2.     अद्ययावत कौशल्य प्रशिक्षण आणि आधुनिक साधने तसेच तंत्रज्ञान उपलब्ध करुन देणे. 
3.      देशांतर्गत आणि जागतिक बाजारपेठाशी जोडून त्यांना विपणन प्रक्रियेत मदत करणे.
4.      योजनेचे स्वरूप, लाभार्थ्यांची ओळख पटवणे आणि अंमलबजावणी आराखडा.