11th June Headlines : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आज आळंदीहून प्रस्थान होणार आहे. तर, संत तुकाराम महाराजांची पालखी आज इनामदार वाड्यातून निघणार आहे. औरंगजेबाचे पोस्टर झळकवणाऱ्यांवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी आज सकल हिंदू समाजाने भिंगार बंदची हाक दिली आहे.
पालखी वारी विशेष:
- संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आज आळंदीहून प्रस्थान होणार आहे. सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आळंदी मंदिराच्या दर्शन मंडपातून प्रस्थान ठेवणार आहे. पहिला मुक्काम आकुर्डीला असणार आहे.
- संत तुकाराम महाराजांची पालखी आज इनामदार वाड्यातून निघेल आणि देहूतच मुक्कामी असेल.
- नांदेड - साधू महाराज देवस्थान यांची पंढरपूरला दिंडी निघणार आहे. कंधार गावातून ही दिंडी पंढरपूरसाठी निघणार आहे.
दिल्ली
- पंतप्रधान आज पहिल्या राष्ट्रीय प्रशिक्षण परिषदेचे उद्घाटन करणार
- केंद्र सरकारने काढलेल्या अध्यादेशाविरोधात आम आदमी पक्षाची आज रॅली असणार.
उत्तर प्रदेश
- गोंडा (यूपी) - लैंगिक छळाच्या आरोपांनी घेरलेले ब्रिजभूषण आज दाखवणार आपली राजकीय ताकद. गोंडा येथे एका जाहीर सभेला ते संबोधित करणार आहेत. नरेंद्र मोदी सरकारला 9 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भाजपच्या महासंपर्क अभियानांतर्गत या रॅलीचे आयोजन करण्यात आलं आहेत.
- दशनाम गोसावी समाजाच्या अधिवेशनाच्या कार्यक्रमास अजित पवार आणि माजी खासदार संभाजी राजे उपस्थित राहतील
- सुप्रिया सुळे त्यांच्या लोकसभा मतदारसंघातील वारजे भागात दौरा करणार
अहमदनगर
- औरंगजेबाचे पोस्टर झळकवणाऱ्यांवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी आज सकल हिंदू समाजाने भिंगार बंदची हाक दिली आहे. याच भिंगारमध्ये औरंगजेबाचा शेवट झाला होता.
अमरावती
- आज केंद्रीयमंत्री नितीन गडकरी अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहे.
नागपूर
- उपमुख्यमंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्यात रामटेक व कामठी विधानसभा क्षेत्राच्या आढावा बैठकी व कार्यकर्ता मेळावा घेतला आहे.
अकोला
- आज दुपारी 12 वाजता केंद्रीयमंत्री नितीन गडकरी आजारी भाजप खासदार संजय धोत्रे आणि भाजप आमदार गोवर्धन शर्मांची भेट घेण्यासाठी अकोल्यात असतील.
बुलडाणा
- केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी आज जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतील.
यवतमाळ
– आज उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून शिंदे गटाचे मंत्री संजय राठोड यांच्या दिग्रस मतदार संघात पदाधिकारी मेळावा आयोजित करण्यात आलाय.
संभाजीनगर
- केंद्रीयमंत्री नितीन गडकरी हे आज संभाजीनगर दौऱ्यावर आहेत.