Landslide:  वाढती वादळे आणि त्याचा मानवी जीवनावर होणारा परिणाम कसा रोखता येईल यासाठी केंद्र आणि राज्य सरकार एकत्रित येऊन नवा आराखडा तयार करीत आहे. जवळपास 10 हजार कोटी खर्चाचा हा आराखडा तयार केला जात आहे. या आराखड्यानुसार कोकणातील सुमारे एक हजार 50 गावांवर दरडी कोसळण्याचा धोका आहे. पालघरमधील भूकंपग्रस्त गावे आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या तीन जिल्ह्यातील दरडग्रस्त आणि वादळात सापडणारी गावे अशा गावांसाठी हा आराखडा आहे.


पालघर जिल्ह्यातील डहाणू,तलासरी हे तालुके भूकंपग्रस्त तालुके म्हणून ओळखले जातात. गेल्या तीन वर्षात या भागात 33 भूकंप झाल्याची नोंद करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यामध्ये 103 दरडग्रस्त गावे आहेत. समुद्राच्या उदानाच्या कार्यक्षेत्रातील 62 गावे तर 128 खाडीकिनारी असलेली गावे आहेत. नदीच्या पुरामध्ये सापडणारी 48 गावे आहेत. या सर्व गावांवर असणारा संभाव्य धोका लक्षात घेता कायमस्वरूपी उपाय योजनांसाठी अडीच हजार कोटींचा आराखडा केला तयार केला आहे.


सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने दरडग्रस्त आणि समुद्रकिनारी उधाणाच्या टप्प्यातील देवगड, मालवण, वेंगुर्ले भागातील जवळपास 75 गावे आणि सह्याद्री पट्ट्यातील वैभववाडी ते सावंतवाडी येथील 103 गावे अशा गावांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव आहे.


रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दापोली, गुहागर, रत्नागिरी, राजापूर या पट्ट्यातील समुद्र आणि खाडी किनाऱ्यावरील जवळपास 109 गावे तसेच सह्याद्री पट्ट्यातील मंडणगड, खेड, चिपळूण, संगमेश्वर, लाजा, राजापूर यामधील 503 गावे नव्या आराखड्यात समाविष्ट करण्याचे धोरण आहे. त्यातून तेथे विविध उपाय राबवले जाणार आहेत.


दरडग्रस्त गावांना मिळणार आधार


या आराखड्यानुसार गेल्या वीस वर्षात कोकणची वादळात सरासरी 2000 कोटींची हानी झाल्याचे नुकसानाच्या आढाव्यातून पुढे आले आहे. त्यानंतर समुद्र किनारपट्टीच्या सर्व जिल्ह्यांमध्ये भूमिगत वीज वाहिन्यांचे नवे प्रकल्प जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हा समाविष्ट आहेत. विशेषतः सह्याद्री पट्ट्यातील दरडग्रस्त गावे या नव्या आराखड्यात आहेत.


गावांचे टप्पे कोकणातील पाच जिल्ह्यांमधील नदी किनाऱ्यावरील गावे खाडी किनाऱ्यावरील गावे समुद्राच्या उधाणाच्या पट्ट्यातील गावे तसेच सह्याद्री पट्ट्यातील दरडग्रस्त गावे असे टप्पे करण्यात आले आहेत. कोकणच्या पाच जिल्ह्यातील दीड हजार गावे इक्वसेंसिटिव्ह झोनमध्ये घेण्यात आली असून त्यात बहुतांशी गावे ही दरडग्रस्त म्हणून ओळखले जातात. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: