या शंभराव्या फेरीमधून लातूरला आतापर्यंत २३ कोटी २० लाख लिटर पाणी रवाना करण्यात आलं आहे. लातूरला अपेक्षित पाऊस अजूनही झाला नाही. मांजरा धरणही अद्याप कोरडंच आहे. त्यामुळे लातूरचे जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी ऑगस्टपर्यंत पाणी पुरवठा करण्यात यावा असा विनंतीवजा प्रस्ताव रेल्वेला पाठवला होता.
रेल्वे प्रशासनाने प्रस्ताव तात्काळ मंजूरही केला. यामुळे जलदूतला ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे.
दरम्यान जलदूत या एक्स्प्रेसच्या १०० फेऱ्यांचं भाडं हे अकरा कोटींवर पोहचलं आहे. आणि रेल्वे हे भाडं शासनाकडून वसूल करणार का हा प्रश्न अजून प्रलंबित आहे.
दरम्यान, मुंबई चेंबर ऑफ कॉमर्सने मे महिन्यात ९४ लाख रुपयांची देणगी जलदूतसाठी दिली होती. त्यानंतर आणखी दोन संस्थनी देखील पन्नास लाख रुपये दिले होते.