सोलापूर : साताराहून करमाळ्याकडे जाणाऱ्या एसटीला अकलूजजवळील वठफळी इथे भीषण अपघात झाला. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर 22 जण जखमी झाले आहेत.


 

करमाळा डेपोची एसटी साताराहून करमाळाकडे जात होती़. मात्र वटफळीजवळ बाईकस्वाराला चुकवताना एसटी बस झाडाला धडकल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती आहे.

 

या घटनेत बाईकस्वारासह चार जणांनी जागीच प्राण सोडले. एकूण 22 जण जखमी झाले आहेत, त्यापैकी 8 जण गंभीर जखमी आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अपघातातील जखमींना उपचारांसाठी शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.

 

या भीषण अपघातात बस चालक अंकुश आणि कन्डक्टर पाटील सुदैवाने बचावले. अपघातानंतर परिसरातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. स्थानिकांच्या मदतीने अपघातातील रुग्णालयात दाखल केलं.

 

मृतांची नावं

दया वामन (वय 32 वर्ष, रा माळशिरस, बाईकस्वार), किसन सिद्राम पिसे (वय 70 वर्ष, रा. माळेवाडी, एसटी प्रवासी), अजय स्वामी (वय 50 वर्ष, रा. अकलूज, एसटी प्रवासी), एकाची ओळख अद्याप पटलेली नाही.

 

जखमींची नावं

रामचंद्र दामु गोडसे (वय 67 वर्ष), अमोल हनुमंत रणवरे (वय 26 वर्ष),  उदय कुलकर्णी,  एकता इंगोले (वय 42 वर्ष), एका महिलेची ओळख पटलेली नाही, यांच्यावर अकलूजमधील इनामदार हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे.

 

शकुंतला सुरेश घाडगे (वय 65 वर्ष),  निलाबाई विठ्ठल पराडे (वय 35 वर्ष),  भगवान सखाराम देशमुख (वय 85 वर्ष), यांना अकलूजच्या गुळवे हॉस्पिटल उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे.

 

अतुल जालिंदर राऊत (वय 25 वर्ष), अण्णा सोनबा कांबळे (वय 65), शरद चिंतामणी कुणेकर (वय 38 वर्ष),  लक्ष्मण बापुराव धाईंजे (वय 66 वर्ष), यांच्यावर अकलूज क्रिटीकेअर रुग्णालयात उपचार सुरु आहे.

 

संदीप पोपट कांबळे (वय 35 वर्ष,  वसंत परशुराम कोळी (वय 50 वर्ष),  उमाकांत चंद्रकांत कुंभार (वय 40 वर्ष) यांना उपचारासाठी अकलूजच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं आहे.