देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा


1. दिल्ली हिंसाचारातील बळींची संख्या 27 वर, 100 जणांना अटक, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आज राष्ट्रपतींना भेटणार

2. शहीद कॉन्स्टेबलच्या कुटुंबीयांना एक कोटीची, तर हिंसाचारातील मृतांना दोन लाखांची मदत, मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांची घोषणा

3. कांद्यावरील निर्यातबंदी केंद्र सरकार उठवणार, यंदा कांद्याचं उत्पादन वाढण्याची शक्यता असल्यानं निर्णय, शेतकऱ्यांना मोठा दिलासा

4. हरभरा, तूर खरेदीच्या ऑनलाईन नोंदणीसाठी शेतकऱ्यांची जात विचारल्यानं संताप, मराठवाड्यातला धक्कादायक प्रकार उजेडात, जातीचा रकाना हटवण्याची मागणी

5. मराठी विषय न शिकवल्यास शाळेचा परवाना रद्द, तर संचालकांना 1 लाखाच्या दंडाची तरतूद, मराठी दिनाच्या पूर्वसंध्येला विधान परिषदेत विधेयक मंजूर

6. सावरकरांच्या गौरव प्रस्तावावरुन जोरदार गदारोळ, काँग्रेसच्या शिदोरी मासिकावर बंदी घालण्याची फडणवीसांची मागणी, तर भारतरत्नावरुन सेनेचा भाजपला टोला

7. बांगड्या भरा म्हणणं महिलांचा अपमान, फडणवीसांच्या टीकेला आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर, तर रेशीम किड्याशी तुलना करत अमृता फडणवीसांचा आदित्य ठाकरेंवर पलटवार

8. कोरोनाची औषधं घेऊन चीमध्ये गेलेलं भारतीय विमान परतलं, परतीच्या प्रवासात 80 भारतीयांसह मित्र देशाच्या 40 नागरिकांची सुटका

9. सरोगसीच्या कायद्यात केंद्र सरकारकडून मोठा बदल, पतीचा मृत्यू आणि घटस्फोटानंतरही महिलांना सरोगसीचा अधिकार

10. रशियाची अव्वल टेनिसपटू मारिया शारापोव्हाची व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती; वयाच्या 32व्या वर्षी व्यावसायिक टेनिसला गुडबाय