Maharashtra Weather Update : गेल्या आठवड्याभरापासून राज्यातील बहुतांश भागात पावसाने (Heavy Rain) तळ ठोकला आहे. या मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केल्याचे चित्र आहे. तर या पावसाचा सर्वाधिक फटका मराठवाड्याला (Marathwada Rain Update) बसला आहे. असे असताना राज्यातील पावसासंदर्भात एक मोठी आणि काहीशी चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. आधीच पावसाने हैराण झालेल्या महाराष्ट्रात पुढील आठवड्यात देखील पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता (Maharashtra Heavy Rain Alert)  वर्तविण्यात आली आहे.

Continues below advertisement


येत्या 6, 7 आणि 8 ऑक्टोबर रोजी राज्यात पावसाच्या सरी कोसळणा असल्याची शक्यात आहे. यात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागावाकडून वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे पुराच्या तडाख्यातून जेमतेम सावरण्याच्या प्रयत्नात असलेल्या महाराष्ट्र्र पुन्हा पावसाचा अंदाज असल्याने नागरिकांकडून काहीशी चिंता व्यक्त केली जात आहे. तर संभाव्य इशारा लक्ष्यात घेता नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


बंगालच्या उपसागरात पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार (Maharashtra Heavy Rain Alert)


मिळालेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र पुन्हा एकदा निर्माण होणार असल्याने राज्यात पाऊस पडण्याचा अंदाज आहे. दरम्यान आज पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, नाशिक आणि पुणे घाट परिसरासह इगतपुरी, कसारा, लोणावळा, खंडाळा या भागात पावसाचा अंदाज असून या विभागात ऑरेंज अलर्ट जरी करण्यात आला आहे. तर आज रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदुरबार, धुळे, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, छ.संभाजीनगर, कोल्हापूर आणि सातारा घाट परिरातील गगनबावडा, कोयना परिसराला पावसाचा लो अलर्ट जारी करण्यात आला आहे.


दोन्ही शिवसेनेचा दसरा मेळ्यावर पावसाचे सावट ( Shiv Sena Dussehra Rally 2025)


दरम्यान, या पावसाचा फटका आता तीन दिवसांवर होणाऱ्या दोन्ही शिवसेनेचा दसरा मेळ्यावर देखील होणार असल्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार मुंबईवर पावसाचं सावट आहे. तर ठाकरेंचा शिवसेना मेळावा शिवतीर्थावरच होणार असल्याची माहिती आहे. दसरा मेळाव्याच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही शिवसेनेमध्ये सध्या बैठकांचे सत्र सुरू आहे. यामध्ये दसरा मेळाव्याच्या आयोजना संदर्भात निर्णय घेतले जात आहेत. यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेने यंदाचा दसरा मेळावा पावसाचा सावट असलं आणि शिवाजी पार्कवर चिखलाचा साम्राज्य जरी असलं तरी शिवतीर्थावरच मेळावा घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. मुंबईत मुसळधार पाऊस पडत असताना आणि पुढे दोन-तीन दिवस अशाच प्रकारे पावसाचा अंदाज वर्तवला जात असताना सुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेने दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार असल्याचा निर्णय घेतला आहे.


पाऊस असो किंवाचिखल ठाकरेंच्या शिवसेनेचा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार!


दरम्यान, पाऊस असो किंवा शिवाजी पार्क मैदानावर चिखल ठाकरेंच्या शिवसेनेचा मेळावा हा शिवाजी पार्कवरच होणार असून त्यासाठीची तयारी आज दुपारपासून सुरू होईल. या सगळ्या संदर्भात मागील आठवड्यात ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांची उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली. शिवाय काल सेना भवन येथे शिवाजी पार्क येथे होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या नियोजनासंदर्भात बैठक सुद्धा पार पडली. कुठल्याही परिस्थितीत शिवतीर्थावरच ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा होणार, असा निर्णय पक्षाकडून घेण्यात आला असल्याची माहिती आहे.


हे हि वाचा