Ind Vs Pak Final Suryakumar Yadav: दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये भारतीय संघाने पाकिस्तानला हरवून आशिया कपवर (Asia Cup 2025 Final 2025 Trophy) पुन्हा विजेतेपदाचे नाव कोरलंय. आशिया कपच्या 41 वर्षांच्या इतिहासात ही पहिलीच वेळ होती, जेव्हा दोन्ही संघ फायनलमध्ये आमने-सामने आले होते. भारताने पाकिस्तानला पराभूत (Ind vs Pak Final) केले आणि 9व्या वेळेस आशिया कपचे खिताब आपल्या नावावर केले. तिलक वर्मा (Tilak Verma) भारताच्या विजयाचा हिरो ठरला. तिलक वर्माने भारतासाठी शानदार कामगिरी केली आणि शेवटपर्यंत टिकून राहून संघाला अभूतपूर्व विजय मिळवून दिला.
दरम्यान, कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) पुन्हा एकदा अपयशी ठरला. अंतिम सामन्यात त्याने 5 चेंडूत फक्त 1 धाव काढली. असे असले तरी कर्णधार सूर्यकुमार यादवच्या एका मोठ्या निर्णयामुळे तमाम भारतीयांकडून त्याच्या वर कौतुकाचा वर्षाव होत आहे. कर्णधार सूर्यकुमारने आशिया कप विजयानंतर स्वत:चं मानधन भारतीय लष्कराला (Indian army) दिल्याचे घोषित केलंय. या कृतीतून त्याने भारतीय लष्कराप्रति असलेला अभिमान आणि जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या भ्याड हल्ल्याची निष्पाप मृत नागरिकांच्याप्रति संवेदना व्यक्त केल्याचे बोललं जात आहे.
मॅच संपल्यानंतर सूर्यकुमार यादवची अभिमानास्पद कृती (Suryakumar Yadav Donates his Fees to Indian army)
भारताने आशिया कप 2025 फायनलमध्ये पाकिस्तानला 5 विकेटने पराभूत केले. या विजयामुळे भारताला 3 लाख अमेरिकन डॉलर्सचा बक्षीस मिळाले, जे भारतीय चलनात सुमारे 2.6 कोटी रुपये होतो. त्यातच कर्णधार सूर्यकुमारला मिळालेल्या स्वत:च्या मानधनाची पूर्ण रक्कम भारतीय लष्कराला दिल्याचे घोषित केलंय.
विजयानंतर सूर्यकुमार यादव काय म्हणाला? (What Suryakumar Yadav Say?)
मी क्रिकेट खेळायला सुरुवात केल्यापासून, क्रिकेट फॉलो करायला सुरुवात केल्यापासून असा प्रसंग मी कधीच पाहिलेला नाही की विजेत्या संघाने ट्रॉफी नाकारली आहे. तेही अशी ट्रॉफी जी जिंकण्यासाठी आम्ही प्रचंड मेहनत केली आणि सहजासहजी मिळालेली नाही. ही स्पर्धा जिंकणं आमच्यासाठी खूप कठीण होतं. आम्ही 4 तारखेपासून इथे होतो, सलग दोन उत्कृष्ट सामने खेळलो. मला वाटतं आम्ही यासाठी पात्र होतो. यापेक्षा जास्त काही मी सांगू शकत नाही, कारण मी सगळं एका वाक्यात सांगून टाकलंय. माझ्यासाठी खरी ट्रॉफी म्हणजे आमच्या ड्रेसिंग रूममध्ये बसलेले सर्व खेळाडू आणि संपूर्ण सपोर्ट स्टाफ आहेत. हाच तो खरा खजिना आहे, आणि हीच खरी ट्रॉफी आहे, ज्या गोड आठवणींसारख्या माझ्यासोबत कायम राहतील, असं सूर्यकुमार यादवने सांगितले.
संबंधित बातमी: