पुणे : राज्यातील बहुतांश भागासह पुणे जिल्ह्याला पावसाने (Pune Rain Update) अक्षरक्ष: झोडपून काढलं आहे. यात पुणे शहरासह बारामती आणि दौंड परिसरात झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे सर्वत्र एकच दाणादाण उडाली असून पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. रविवारी झालेल्या पावसामुळे बारामतीतील नीरा डावा कालवा फुटला असून त्यामुळे प्रचंड वेगाने पाणी पालखी महामार्गावर आले आणि काटेवाडी-भवानीनगर हा रस्ता बंद करण्यात आला होता. तर बारामतीतील दीडशेहून अधिक लोकांच्या घरात पाणी शिरल्याची घटना घडली आहे. या पावसामुळे नागरिकांचे ही मोठं नुकसान झालं आहे. अशातच या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पावर (Ajit Pawar) हे आज बारामतीच्या दौऱ्यावर आहे.   

Continues below advertisement


बारामतीमध्ये तीन इमारतीला तडे, अजित पवार यांनी केली पाहणी 


भल्या पाहाटे पासून अजित पवार हे बारामतीत दाखल झाले असून यावेळी त्यांनी पूरग्रस्त ठिकाणांची पाहणी केलीय. पवार यांनी एमआयडीसीमधील तडा गेलेल्या इमारतीची पाहणी केली. एमआयडीसी पेन्सिल चौकाशेजारील तीन इमारती शेजारी खुदाई केल्याने इमारतीला तडे गेल्याची घटना घडली. यात साईरंग, ऋषिकेश आणि श्री समर्थ अशी बिल्डिंगची नावे असलेल्या इमारतीचे यामुळे मोठं नुकसान झालं आहे. तर सध्या या इमारतीमधील कुटुंबीयांना स्थलांतर करण्यात आलं आहे. सद्यस्थितीत सर्व फ्लॅट रिकामे करण्यात आले आहेत. सध्या उपमुख्यमंत्री याच परिसराची पाहणी करत आहे.


पुणे पाऊस(मिमी) 09:30 PM 25.05.2025,


दौंड 98.0
लोणावळा 76.0
बारामती 49.5
धामधरे 35.5
वडगावशेरी 34.0 
निमगिरी 28.0 
मालिन 27.0
हडपसर 25.0 
बल्लाळवाडी 18.5 
नारायणगाव 17.0 
डुडुळगाव 12.5 
 मगरपट्टा 8.0 
GIRIVAN 7.0 
लवासा 6.0 
राजगुरुनगर 5.5 
कोरेगाव पार्क 5 
भोर 5 
NDA 3.5 
तळेगाव 2.5 
पुरंदर 0.5 


राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस


दरम्यान दक्षिण कोकण आणि गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने गेल्या तीन ते चार दिवसांपासून या भागांत प्रचंड पाऊस सुरु आहे. येत्या 36 तासांत राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अनेक भागात पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. काही भागात पावसामुळं जनजीवन देखील विस्कळीत झालं आहे. दरम्यान, एका बाजूला पाऊस पडत असताना दुसऱ्या बाजूला काही भागात शेती पिकांना देखील फटका बसत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.


पुणे सोलापूर महामार्गावरील एक इनोवा गेली वाहून 


गेल्या चार दिवसांपासून दौंड तालुक्यात पावसाचा जोर सुरू असल्याने पुणे सोलापूर महामार्गावरील स्वामी चिंचोली या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. दरम्यान पावसाच्या हाहाकाराने पुणे सोलापूर महामार्गावरील एक इनोवा वाहून गेली आहे. सुदैवाने यामध्ये कोणती जीवितहानी झाली नाही. मात्र पुणे सोलापूर महामार्गावर मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या