नवी दिल्ली : राज्यातील धरणातील पाण्याचा केवळ साखर कारखान्यांना फायदा झाला, शेतकऱ्यांना नाही, असं वक्तव्य केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी केलं आहे. लोकसभेत प्रश्नोत्तरादरम्यान मराठवाड्याच्या परिस्थितीबाबत चर्चा झाली.

 

“महाराष्ट्रातील धरणांनी केवळ साखर कारखाने समृद्ध केले. त्यांचा शेतकऱ्यांना फायदा झाला नाही”, असा आरोप करत राधामोहन सिंह काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कारभारावर टीका केली. खासदार सदाशिव लोखंडे यांनी विचारलेल्या प्रश्नांवर त्यांनी हे उत्तर दिलं.

 

महाराष्ट्रात दुष्काळाची भयंकर परिस्थिती आहे. भाजप सरकारला महाराष्ट्राच्या दुष्काळाची पूर्ण जाणीव असून, राज्य सरकार योग्य उपाययोजना करत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे