Maharashtra ATS मुंबईदहशतवादाशी संबंधित एका प्रकरणात राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने (ATS) म्हणजेच महाराष्ट्र एटीएसने ठाण्यातील पडघा येथे छापा टाकला असल्याची माहिती समोर आली आहे. एटीएस पथक साकिब नाचनच्या घरावरही छापे टाकत आहे. दरम्यान बंदी घालण्यात आलेल्या स्टुडंट इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी) या संघटनेचा पदाधिकारी असलेल्या साकिबला यापूर्वी 2 दहशतवादी प्रकरणांमध्ये दोषी ठरवण्यात आले आहे. यामध्ये 2002- 2003 मध्ये मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन विलेपार्ले आणि मुलुंड बॉम्बस्फोटांचा समावेश आहे. या दहशतवादी घटनांमध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. तर 2017 मध्ये शिक्षा पूर्ण झाल्यानंतर तो पुन्हा कट्टरपंथी कारवायांमध्ये सामील झाला, असा आरोप त्याच्यावर आहे. दरम्यान या कारवाईत आता नेमकी काय आणखी नवी माहिती समोर येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Continues below advertisement


 हेरगिरी प्रकरणातील रविकुमार वर्माची आज पोलीस कोठडी संपणार 


नुकतच मुंबई डॉकयार्डमधील अभियंता-तंत्रज्ञ रविकुमार वर्मा (35, रा. कळवा, ठाणे) याला राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने (ATS) गुरुवारी अटक केली. वर्मा भारतीय नौदलाची गोपनीय माहिती एका पाकिस्तानी गुप्तहेर महिलेला पुरवत होता. त्याच्या संपर्कातील आणखी दोन जणांविरोधातही शासकीय गुपिते अधिनियम (ओ.एस.ए.) आणि यूएपीए अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान रविकुमार वर्मा या पाकिस्तानशी हेरगिरी प्रकरणातील आरोपीची आज(2 जून) पोलीस कोठडी संपणार आहे. आज ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात ATSची टीम आरोपीला हजर करणार आहे. आरोपीची पोलीस कोठडी संपल्यानंतर चौकशीसाठी काही दिवस एटीएस न्यायालयात अधिक तपासासाठी पोलीस कोठडी मागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणांना गोपनीय माहिती पाठवल्याचा आरोप


रवी मुरलीधर वर्मा याच्याकडून मुंबईतील नेव्हल डाँकच्या ठिकाणची माहिती पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणांना पाठवल्याचे आरोप होता. संवेदनशील ठिकाणी अनेक नक्षे, आराखडा फेसबुक मार्फत गुप्तचर यंत्रणांना पाकिस्तानच्या एजंटला पाठवल्यामुळे  रवी वर्मा याची चौकशीसाठी ठाणे एटीएस पोलीस कोठडीची मागणी करण्याची शक्यता आहे. शिवाय फेसबुक चाट मार्फत बनावट मुलींच्या नावे पाकिस्तानला 14 पाणबुड्या ,जहाज आणि बेटांची माहिती रवी मुरलीधर वर्मा ने पुरवले असल्याचे समोर आल्याचे बोललं जात आहे. परिणामी आजच्या या सुनावणीत नेमकं काय होतं? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


इतर महत्वाच्या बातम्या