Mahadev Munde Murder Case बीड : महादेव मुंडे खून प्रकरणाचा (Mahadev Munde Murder Case) तपास करण्यासाठी राज्य सरकारकडून नियुक्त करण्यात आलेल्या एस.आय.टी.चे (SIT) प्रमुख पंकज कुमावत यांनीआता नागरिकांना थेट आवाहन केलं. महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणाची कुठलीही माहिती असल्यासत्यांनीतीपोलिसांनीद्यावी, असेआवाहन पंकज कुमावत यांनीकेलंआहे. त्यासाठी कुमावत यांनीत्यांचा व्हाट्सअप नंबर दिलाअसूनज्यालाकुणालाया प्रकरणाची माहितीअसेलती त्यावरद्यावीअसेहीसांगण्यातआलेआहे. सोबतच माहिती देणाऱ्याचे नाव कुठल्याही परिस्थितीत उघड केले जाणार नसल्याचेही ग्वाहीहीदेण्यातआलीआहे. तसेच माहिती देणाऱ्याला बक्षीस देखील देण्यात येणार असल्याचे एकाप्रसिद्धी पत्रात म्हटले आहे.

पंकज कुमावत यांनीकेली घटनास्थळाची पाहणी

एसआयटीचे (SIT) प्रमुख पंकज कुमावत यांनी सोमवारी परळी येथे भेटदेऊन तहसील समोरील मैदानात असलेल्या घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत एस.आय.टी. मधील सदस्य आणि परळी शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी देखील होते. दुपारी साडेचारच्या दरम्यान घटनास्थळी पोहचलेले पथक रात्री आठ वाजेपर्यंत घटनास्थळीच होते. यावेळी कुमावत यांनी संपूर्ण घटनाक्रम समजून घेतला, आता यानंतर तपासाला सुरुवात होणार आहे. महादेव मुंडे यांचे मारेकरी 21 महिन्यापासून मोकाटच आहेत. याअनुषंगानेयाप्रकरणाच्यातपासालावेगआलेआहे. त्यातचआताया खून प्रकरणाची कुठलीही माहिती असल्यासत्यांनीतीपोलिसांनीद्यावी, असेआवाहन पंकज कुमावत यांनीकेलंआहे.

बारा गुंठ्याच्या व्यवहारातूनच खून झाला, महादेव मुंडे यांच्या वडिलांची माहिती

राज्यात सध्या गाजत असलेल्या महादेव मुंडे खून प्रकरणाची चौकशीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या एसआयटीने आता या प्रकरणाची माहिती महादेव मुंडे यांचे भाऊ तथा या प्रकरणाचे फिर्यादी अशोक मुंडे आणि वडील दत्तात्रय मुंडे यांच्याकडून जाणून घेतली. यानंतर अशोक मुंडे यांनी त्यांच्याकडे असलेली संपूर्ण माहिती आम्ही पुढीलतपासासाठी दिले असल्याचे सांगितले. तसेच एसआयटीचे प्रमुख कुमावत यांनी आरोपींना गजाआड करणार असल्याचे आश्वासनहियावेळीदिले. यावेळी महादेव मुंडे यांचे वडील दत्तात्रय मुंडे यांच्याकडून देखील एसआयटीने या प्रकरणाची माहिती जाणून घेतली आणि महादेव मुंडे यांचा खून 12 गुंठे प्लॉटच्या व्यवहारातून झाला असून याच दिशेने या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी ही केलीये.

ही बातमी वाचा: