सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माळशिरसचे आमदार उत्तम जानकर (Uttam Jankar) हे अलीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या चांगल्याच प्रेमात पडल्याचे दिसत होते. यावरून आता त्यांना त्यांच्याच पक्षाच्या संकल्प डोळस (Sankalp Dolas) यांनी चांगलेच डिवचले आहे. नातेपुते येथे होलार समाजाच्या मेळाव्यात बोलताना शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी राज्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कर्णासारखे दानशूर असल्याचे वक्तव्य केले होते. यावेळी स्टेजवर शिंदे गटाचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ (Sanjay Shirsat) आणि फलोत्पादन मंत्री भरत शेठ गोगावले (Bharatshet Gogawale) होते.
दरम्यान, आमदार जानकर यांच्या वक्तव्यावर संकल्प डोळस यांनी जोरदार चिमटे काढले असून इतकी वर्ष आमदारकीसाठी धडपडला. पण तुम्हाला आमदार करायचे काम शरद पवार (Sharad Pawar) आणि विजय दादा (Vijaysinh Mohite Patil) यांनीच केले. यापूर्वी तुम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेपासून शरद पवारांच्या राष्ट्रवादीपर्यंत चार पक्षाचे चारोधाम फिरून आलात. मात्र तुम्हाला प्रत्येक वेळा पराभूत व्हावे लागले. यंदा पहिल्यांदाच तुम्हाला मिळालेली आमदारकी ही शरद पवार आणि विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या कृपेमुळे मिळाली आहे. असे असताना तुम्हाला एवढे मोठे नेते सोडून राज्याचे एक नेते हे कर्णा सारख दानशूर वाटू लागले आहेत. अशी बोचरी टीका संकल्प डोळस यांनी केली आहे.
सह्याद्रीसारख्या विजयदादा आणि हिमालयासारख्या शरद पवार यांनी तुम्हाला आमदार केलं
दरम्यान, यापूर्वी तुम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटना, भाजप, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी फिरून आलात. ज्या मोहिते पाटलांना 40 वर्ष विरोध केल्याने तुम्हाला कधी विधानसभेला जाता आले नव्हते, त्याच सह्याद्रीसारख्या विजयदादा आणि हिमालयासारख्या शरद पवार यांनी तुम्हाला आमदार केले. मग या ज्येष्ठ नेते तुम्हाला कधी कर्ण दिसला नाही का? आत्ताच तुम्हाला एकनाथ शिंदे यांच्यामधील दानशूरपणा कसा दिसला आणि याचे कारण काय? असा प्रश्न संकल्प तुळस यांनी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना विचारला आहे.संकल्प डोळस हे माळशिरस येथील दिवंगत आमदार हनुमंतराव डोळस यांचे सुपुत्र असून उत्तम जानकर यांच्या जातीच्या प्रमाणपत्राबाबत त्यांनीच मुंबई उच्च न्यायालयात जानकर यांना अडचणीत आणले आहे.
महत्वाच्या बातम्या: