Maha Kumbh 2025: सध्या प्रयागराजमध्ये गंगेच्या काठावर महाकुंभ सुरू असून कोट्यवधी भाविक गंगेत पवित्र स्नान करत आहे. अशातच गंगा नदीच्या पाण्याचा दर्जा आणि प्रदूषणाचा मुद्दा वारंवार चर्चेत येतोय. मात्र गंगा नदीच्या पाण्यामध्ये काही खास गुण असून त्यामुळे गंगेचे पाणी स्वतःला स्वतःहून शुद्ध व स्वच्छ करण्याची क्षमता ठेवते, आणि हे एखाद्या धार्मिक संगठनेचे मत नाही, तर हे पर्यावरण क्षेत्रात देशात सर्वोच्च स्थानी असलेल्या "राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था" म्हणजेच निरीच्या संशोधनात हे समोर आले आहे.
गेले बारा वर्ष निरीच्या एका खास टीमने गोमुख ते गंगासागर दरम्यान गंगेच्या पाण्याचं अभ्यास केला, आणि त्यामध्ये गंगेचा पाणी काही खास गुणांमुळे स्वतःला शुद्ध ठेवण्याची अनोखी क्षमता बाळगते, जर गंगेच्या पाण्याला अविरत वाहू देण्यात आले, तर गंगेच्या पाण्यातील ऑक्सिजनचे उच्च प्रमाण, काठावरील वनस्पतीमुळे पाण्यात विरघळणारे टरपीन्स खास बैक्टेरियोफाज आणि गंगेच्या तळाशी असलेले सेडीमेंट्स गंगेच्या पाण्याला अवघ्या काही किलोमीटरच्या प्रवाहात पुन्हा शुद्द करते. असे निरीच्या संशोधनातून समोर आले आहे. निरीने डिसेंबर 2024 मध्ये हे अहवाल केंद्र सरकारला सादर केल्याची माहिती आहे.
गंगेच्या पाण्यात स्वत:हून शुद्ध होण्याचे गुणधर्म
प्रामुख्याने चार कारणांमुळे गंगेचा पाणी इतर नद्यांच्या तुलनेत जास्त शुद्ध राहते.
-त्यातील पहिले कारण म्हणजे गंगेच्या पाण्यात विरघळलेला ऑक्सिजन (Dissolved Oxygen) इतर नद्यांच्या तुलनेत खूप जास्त आहे.
-गंगा हिमालयात खूप जास्त उंचीवरून आणि अत्यंत कमी तापमानाच्या प्रदेशातून वाहत येते, अत्यंत कमी तापमानामुळे गंगेच्या पाण्यात विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण जास्त असून ते पाण्याला शुद्ध ठेवते.
-दुसरे प्रमुख कारण म्हणजे गंगेच्या किनाऱ्यावर जे नैसर्गिक वनस्पती आणि झाडे झुडुपे आहेत, ते मोठ्या प्रमाणावर "टरपीन्स" उत्सर्जित करतात आणि तेच टरपीन्स गंगेच्या पाण्याला शुद्ध करण्याचा काम करतात.
-तिसरे महत्वाचा कारण म्हणजे गंगेच्या पाण्यातील "बैक्टेरियोफाज" जे बैक्टेरियाचा नैसर्गिक शत्रू असून गंगेचा पाण्याला कोणत्याही बैक्टेरिया पासून मुक्त ठेवून शुद्ध करते.
-गंगेच्या पाण्याच्या शुद्धतेचे आणखी एक कारण म्हणजे गंगेच्या पात्रात तळावर असलेले अत्यंत बारीक दगड, गोटे, कण म्हणजेच sediments. ते ही वाहत्या गंगेच्या पाण्याला एका चाळणीसारखे शुद्ध करण्याचे काम करतात, असे नीरीच्या संशोधनात आढळले आहे.
-गंगेच्या तळाशी असलेल्या सेडीमेंट्सची खासियत म्हणजे जेव्हा गंगेचे पाणी वाहते असते, सेडीमेंट्स त्यात खेळते असतात, तेव्हा ते गंगेच्या पाण्याला जास्त क्षमतेने शुद्ध करतात.
-मात्र, जिथे गंगेच्या प्रवाहाला थांबविले जाते, तेव्हा तळाशी असलेले दगड, गोटे, कण (sediments) यांची गंगेच्या पाण्याला शुद्ध करण्याची क्षमता कमी होते.
-वरील सर्व गुणांमुळे गंगेचा पाणी मानवी उपस्थिती आणि विविध मानवी कार्यांमुळे जरी अशुद्ध होत असले, तरी थोड्या अंतरावर वाहत जाऊन गंगेचा पाणी विरघळलेले ऑक्सिजन, टरपीन्स, बैक्टेरियोफाज आणि सेडीमेंट सारख्या घटकांमुळे स्वतःला काही प्रमाणात शुद्ध करून घेते.
नीरीने हे अभ्यास कसे केले?
-नीरीचा हा अभ्यास २५१० किमी लांब गंगा नदीला तीन भागांमध्ये विभाजित करून करण्यात आला आहे
-पहिला भाग गोमुख ते हरिद्वार, दुसरा भाग हरिद्वार ते पाटणा आणि तिसरा भाग म्हणजे पाटणा ते गंगा सागर असा होता.
-एकूण १५५ जागांवर हजारो सॅम्पल्स घेण्यात आले.
-या अभ्यासात नीरीसह विविध आयआयटी, बनारस हिंदू विद्यापीठ सारख्या प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांनी सुद्धा सहकार्य केले आहे.
-डिसेंबर २०२४ मध्ये नीरीने गेल्या अनेक वर्षांच्या अभ्यासाचा इश्कर्स केंद्र सरकारला सोपविला आहे.
दरम्यान गंगेची ही खासियत ऐकल्यानंतर अनेकांच्या मनात असे प्रश्न ही निर्माण होऊ शकतात की इतर नद्यांत हे गुण नाहीत का. तर नीरीने त्याचा ही अभ्यास केला असून नीरीने गंगे सह तुलनेसाठी यमुना आणि नर्मदेच्या पाण्याचा ही सारखाच अभ्यास केला असून त्यात पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण, पाण्यात विरघळणारे टरपीन्स, बैक्टेरियोफाज आणि सेडिमेंट या चारही गुणांच्या बाबतीत यमुना आणि नर्मदा गंगेच्या बऱ्याच मागे आहेत असे निरीला आढळले आहे.
हे ही वाचा