Lucky Sign on Palm : तुमच्या हातावरील रेषांवरुन तुमच्या भविष्याबद्दलची भाकितं केली जातात, हे तुम्हाला माहित असेलच. तर हस्तरेषा शास्त्रात (Palmistry) तळहातावरील रेषांवरुन भविष्य सांगितलं जातं.  तळहातावर अशा काही रेषा असतात, ज्या यशाशी निगडीत असतात. तळहातावर या रेषा असल्यास तुमची आर्थिक स्थिती तर मजबूत होतेच, पण तुमचं लव्ह लाईफही चांगलं बनतं. तुम्हाला आयुष्याचा खरा जोडीदार मिळतो आणि उत्पन्नाच्या अनेक संधीही मिळतात.


हस्तरेषा शास्त्रानुसार, जर एखाद्या व्यक्तीच्या हातावर V चिन्ह असेल तर त्याची खूप प्रगती होते. 


तळहातावर नेमकं कुठे असतं हे चिन्ह?



तुमच्या तळहातावर V चिन्ह तळहाताच्या वरच्या बाजूला असतं. फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे, तळहातावर ही खूण असल्याने व्यक्तीला एका विशिष्ट वयानंतर यश मिळत जातं. जर तुमच्या तळहातावर हे चिन्ह असेल तर तुम्ही समजून घ्या की, तुमचं आयुष्य उज्वल असणार आहे. आता जरी तुम्हाला खडतर आव्हानांचा सामना करावा लागत असलं तरी तुमचं भविष्य सुंदर असणार आहे.


वयाच्या पस्तीशीनंतर उजळतं नशीब


हस्तरेषा शास्त्रानुसार, तर्जनी आणि मधल्या बोटामध्ये V चिन्ह असणं शुभ मानलं जातं. तळहातावर V चिन्ह असलेल्या लोकांचं नशीब वयाच्या पस्तीशीनंतर चमकतं. सुरुवातीला त्यांना कठोर परिश्रम करावे लागतात, परंतु हळूहळू या लोकांना त्यांच्या मेहनतीचं दुप्पट फळ मिळू लागतं.


असे स्त्री-पुरुष असतात भाग्यवान


ज्या लोकांच्या तळहातावर V चिन्ह असतं ते खूप भाग्यवान मानले जातात. असे लोक केवळ त्यांच्या जीवनातच प्रगती करत नाहीत, तर त्यांच्या जोडीदारालाही सोबत नेतात. V चिन्ह असलेल्या स्त्री-पुरुषांचं वैवाहिक जीवनही खूप प्रेमाने भरलेलं असतं. त्यांचा जोडीदाराशी चांगला समन्वय असतो.


भरपूर पैसा कमवतात आणि विलासी जीवन जगतात


तळहातावर V चिन्ह असणारे लोक खूप पैसे कमावतात. अशा लोकांना काही मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरी मिळते आणि तिथेही अशा लोकांना मोठ्या पदांवर नियुक्त केलं जातं. त्याचबरोबर प्रयत्न केले तर अशा लोकांना सरकारी नोकऱ्याही लवकर मिळतात. व्यवसायात भरपूर प्रगती करण्याबरोबरच, असे लोक 30-35 वर्षांचे होईपर्यंत आयुष्यात खूप पैसे कमावतात आणि विलासी जीवन जगतात.


कठीण आव्हानांना घाबरत नाहीत


हस्तरेषा शास्त्रज्ञांच्या मते, ज्या लोकांच्या तळहातावर V चिन्ह असतं, ते कठीण प्रसंगांनाही धैर्याने सामोरे जातात. अशा लोकांचं व्यक्तिमत्व अडचणीतून देखील मार्ग काढणारं असतं. ते आव्हानांना संधी म्हणून स्वीकारतात आणि प्रगती करत राहतात. अशा लोकांचं नशीब वयाच्या 35 व्या वर्षापासून उजळू लागतं आणि चाळिशीपर्यंत पोहोचल्यावर त्यांचं आयुष्य राजासारखं बनतं.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Shani Dev : शनि नक्षत्र परिवर्तनामुळे 'या' राशींना करावा लागणार अडचणींचा सामना; साडेसातीचाही होणार त्रास