विरार : विरारमध्ये कौटुंबिक वादातून एका इसमाने आपल्या सासूची हत्या (Virar Murder Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. बुधवारी दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली. विशेष म्हणजे हत्या करून पळून जाण्याचा तयारीत असलेल्या आरोपीच्या मुलांनी त्याला घरात कोंडून ठेवल्याने तो पकडला गेला. 


विरार पूर्वेच्या (Virar News) साईनाथ नगर परिसरात मागील तीन महिन्यापासून प्रशांत खैरे हा पत्नी कल्पना खैरे , दोन मुलं व सासू यांच्या सोबत भाड्याच्या घरात राहत होता. प्रशांत याला दारुचे व्यसन असल्याने मद्यपान करून पत्नी कल्पना खैरे व सासू लक्ष्मी खांबे यांना शिवीगाळ करून त्रास देत होता.


बुधवारी दुपारी प्रशांत मद्यपान करून घरी आला होता. त्यावेळी त्याची पत्नी कामासाठी मुंबईला गेली होती. प्रशांतचा सासू लक्ष्मी बरोबर वाद झाला. याच वादातून प्रशांत खैरे याने सासूचे हात पाय बांधून मानेवर व पोटावर धारदार शस्त्राने वार करून तिची हत्या केली. हत्या करून प्रशांत पळून जाण्याच्या तयारीत होता. घरात असलेल्या मुलांनी दरवाजाला कडी लावून प्रशांत याला आत डांबले. व आजूबाजूला आरडाओरडा करून नागरिकांना गोळा करून पोलिसांना या घटनेची माहिती दिली. विरार पोलीसांनी या आरोपीला अटक केली आहे.


नेमकं काय घडलं?


साईनाथ नगर येथील जानुवाडी परिसरात वामन निवास येथे लक्ष्मी खांबे (वय ६०) या मुलगी आणि नातवासोबत राहत होत्या. त्यांची मुलगी कल्पनाचे (वय 39) हिचे प्रशांत खैरे (वय 41) याच्याशी 2012 साली लग्न झाले होते. प्रशांत हा नेहमी दारु पिऊन कल्पनाला मारहाण करायचा. बुधवारी प्रशांत नेहमीप्रमाणे दारु पिऊन आला. त्यावेळी कल्पना घरी नव्हती. त्यावेळी दारुच्या नशेत असलेल्या प्रशांतने सासूसोबत वाद झाल्यानंतर लक्ष्मी खांबे यांना बेडरुममध्ये नेऊन तोंड, हात-पाय बांधले. यानंतर प्रशांतने चाकूने त्यांच्या मानेवर, पोटावर वार केले. यामध्ये लक्ष्मी खांबे यांचा मृ्त्यू झाला. या घटनेनंतर कल्पनाने विरार पोलीस ठाण्यात आईच्या हत्येप्रकरणी तक्रार देऊन पतीवर गुन्हा दाखल करायला लावला.


आणखी वाचा


"मुझे जान के बदले जान चाहिए", तरच आरतीला न्याय मिळेल, भररस्त्यात लेकीच्या हत्येनंतर मातेने टाहो फोडला


'हे सगळं पाहून माझं रक्त उसळलंय...', वसई प्रकरणावर रविना टंडन संतापली


दोघे लग्न करणार होते, पण मुलीच्या संपर्कात दुसरा मुलगा आला, वसई हत्याकांडाबाबत चित्रा वाघ यांनी नवा अँगल समोर आणला!