Astrology 20 June 2024 : ग्रहांच्या स्थितीनुसार, आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. आज गुरुवार, 20 जूनला वृश्चिक राशीत चंद्राचं भ्रमण होणार आहे. तसेच आज ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथी असून या दिवशी शुभ योग, रवियोग, सर्वार्थ सिद्धी योग आणि अनुराधा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजच्या दिवसाचं महत्त्व वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार 5 राशींना आज बनत असलेल्या शुभ योगांचा लाभ मिळेल. या भाग्यवान राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.


वृषभ रास (Taurus)


वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ आहे. वृषभ राशीचे लोक आज महत्त्वाची कामं पूर्ण करण्यात यशस्वी होतील आणि त्यांची परदेशात जाण्याची इच्छा पूर्ण होईल. विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्याशी संबंधित निर्णय घेण्यासाठी शिक्षक आणि कुटुंबातील सदस्यांचं पूर्ण सहकार्य मिळेल. आज मोठ्या प्रमाणात नफा मिळवण्याच्या चांगल्या संधी व्यावसायिकांना मिळतील, ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. रोजगाराच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आज नवीन संधी निर्माण होतील. कौटुंबिक जीवनात काही अडचणी येत असतील तर आज भगवान विष्णूच्या कृपेने त्या दूर होतील आणि कुटुंबातील सदस्यांची चांगली प्रगती होईल.


कन्या रास (Virgo)


कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. कन्या राशीचे लोक आज संयमाने सर्व समस्यांवर मात करतील आणि त्यांच्या कामावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करतील. तुमचं संवाद कौशल्य आज उत्कृष्ट असेल, ज्यामुळे तुम्ही अनेक नवीन मित्र बनवाल. नोकरी करणाऱ्या लोकांनी त्यांच्या करिअरमध्ये प्रगती करण्यासाठी जे काही प्रयत्न केले असतील त्यात त्यांना पूर्ण यश मिळेल. आज तुम्हाला मित्रांकडूनही पूर्ण सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनाविषयी बोलायचं झालं तर, तुमच्या जोडीदारासोबत सुरू असलेला वाद किंवा गैरसमज आज पूर्णपणे दूर होतील आणि नात्यात गोडवा येईल. तुमच्या भावंडांसोबत तुमचे संबंध चांगले राहतील आणि तुमच्या वडिलांच्या मदतीने तुमची अनेक कामं पूर्ण होतील.


धनु रास (Sagittarius)


आजचा दिवस धनु राशीच्या लोकांसाठी चांगला असणार आहे. धनु राशीच्या लोकांच्या जीवनातील आर्थिक समस्या आणि कौटुंबिक समस्या दूर होतील. जर तुम्ही आरोग्याशी संबंधित कोणत्याही समस्येने त्रस्त असाल तर आज तुमचं आरोग्य सुधारेल, तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या पूर्णपणे तंदुरुस्त राहाल. नोकरदार लोक आज सहकाऱ्यांसोबत मजा करण्याच्या मूडमध्ये असतील आणि त्यांच्या करिअरचा आनंदही घेतील. व्यापारी आज व्यवसायासाठी नवीन रणनीती बनवतील. वैवाहिक जीवनात गोडवा राहील आणि तुमच्या जोडीदाराचा सल्ला तुम्हाला खूप उपयोगी पडेल.


मकर रास (Capricorn)


मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. आज मकर राशीच्या लोकांच्या व्यक्तिमत्वात सुधारणा होईल आणि नशिबाच्या जोडीने अत्यंत गुंतागुंतीची कामंही सहज पूर्ण होतील. आज तुम्हाला व्यवसायात निर्णय घेताना डोकं वापरावं लागेल, तरच तुम्ही यश मिळवू शकाल. आज कौटुंबिक संबंध चांगले राहतील. याशिवाय घराच्या सजावटीसाठी तुम्ही काही वस्तू खरेदी करू शकता. लव्ह लाईफबद्दल बोलायचं झालं तर, आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून भेटवस्तू मिळू शकते आणि तुम्ही एकत्र बाहेरही जाऊ शकता. व्यावसायिकांना आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. जुन्या कर्जातून आज तुम्हाला सुटका मिळेल.


कुंभ रास (Aquarius)


आजचा दिवस कुंभ राशीच्या लोकांसाठी चांगला असणार आहे. कुंभ राशीच्या लोकांना आज आयुष्यात सुख आणि मानसिक शांती दोन्ही मिळेल. मुलांच्या चांगल्या वागणुकीमुळे आणि त्यांच्या यशामुळे तुम्ही आनंदी व्हाल. घरातून बाहेर पडताना आई आणि वडिलांचा आशीर्वाद घ्या, यामुळे तुमच्या कामात तुम्हाला यश मिळेल. तुम्हाला लव्ह लाईफमध्ये तुम्ही आनंददायी क्षणांचा अनुभव घ्याल, प्रियकरासोबत रोमँटिक डिनरवर जाऊ शकता. आजचा दिवस देव दर्शन आणि शुभ कार्यात व्यतित होईल. तुम्ही मित्रांसोबत सहलीला जाण्याचा विचार कराल. व्यावसायिक चांगला नफा कमावतील.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Horoscope Today 20 June 2024 : आज गुरुवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? तुमचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या