Elon Musk Buy Twitter : जगविख्यात ‘टेस्ला’ कंपनीचे सर्वेसर्वा एलॉन मस्क (Elon Musk) यांनी आता ट्विटर कंपनी देखील विकत घेतली आहे. आता एलॉन मस्क ‘ट्विटर’चे नवे मालक झाले आहेत. 44 अब्ज डॉलरमध्ये हा करार पार पडला आहे. ट्विटरमध्ये गुंवणूक केल्यानंतर त्यांनी ही कंपनी खरेदी करायची इच्छा व्यक्त केली होती. मार, कदाचित ही गोष्ट काही लोकांना रुचलेली नाही. एलॉन मस्क ट्विटरचे मालक झाल्यानंतर ट्विटरवरच 'लिव्हिंग ट्विटर' या हॅशटॅगचा पूर आला आहे.
ट्विटरवरून माहिती देताना टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी अखेर ट्विटर विकत घेतल्याची पुष्टी केली आहे. कंपनीने सांगितले आहे की, मस्क यांनी ट्विटर विकत घेण्यासाठी 44 अब्ज डॉलरचा करार केला आहे आणि आता ते ट्विटरचे नवे मालक झाले आहेत. यानंतर लोक ट्विटरवर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सोडण्याचा विचार करत आहेत. काही लोक यावर टीका करत आहेत, तर काही लोक यावर भन्नाट मीम्स शेअर करत आहेत.
नेटकऱ्यांनी पाडला मीम्सचा पाऊस
एलॉन मस्क मागील काही काळापासून ट्विटरचे शेअर्स खरेदी करत होते. त्यानंतर त्यांनी थेट ट्विटरच्या संचालक मंडळाला ट्विटर विकत घेण्याची ऑफर दिली. एलॉन मस्क यांनी प्रति शेअर 54.20 डॉलर दराने ट्विटर विकत घेण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, ट्विटरमध्ये गुंतवणूकदार असलेले सौदी अरेबियाचे प्रिन्स अल वलीद बिन तलाल अल सौद यांनी ट्विट करून एलॉन मस्क यांची ऑफर नाकारली होती. मात्र, त्यानंतर बोर्डाला ही ऑफर पसंत पडली आणि एलॉन मस्क आता ट्विटरचे नवे मालक झाले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :