दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.




1. समृद्धी महामार्गावर वर्धा जिल्ह्यातून जाणाऱ्या उन्नत वन्यजीव मार्गाची कमान कोसळून एकाचा मृत्यू, 2 मे रोजी होणारं उद्घाटन लांबणीवर


2. तारीख ठरली, 4 मे रोजी बाजारात दाखल होणार बहुप्रतीक्षित LIC चा IPO, प्राइज बँड लवकरच जाहीर होणार


3. पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे दोन दिवस दिल्ली दौऱ्यावर, राजकीय गाठीभेटींकडे लक्ष


4. बिनकामाचे भोंगे वाजवणाऱ्यांना काडीचीही किंमत देत नाही, मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंना टोला, राणा दाम्पत्याचाही समाचार


महाराष्ट्रात सार्वजनिक ठिकाणी हनुमान चालीसा पठणावरून वाद सुरू असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि अपक्ष खासदार नवनीत राणा यांच्यावर निशाणा साधला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी दादागिरी कशी मोडायची हे शिकवले आहे, असे ते म्हणाले. तसेच "मला लवकरात लवकर जाहीर सभा आयोजित करायची आहे. मला या बनावट हिंदुत्ववाद्यांशी बोलायचे आहे. मी लवकरच बैठक घेईन, मी त्यांचा मुखवटा उतरवणार आहे. हनुमान चालिसाच्या वादावर मुख्यमंत्र्यांनी काल संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. आणखी काय म्हणाले मुख्यमंत्री?


आमचं गदाधारी हिंदुत्व आहे, विरोधकांवर साधला निशाणा 


यावेळी विरोधकांचा समाचार घेताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ''हिंदुत्व म्हणजे धोतर नाही, घालावं आणि सोडावं, बाबरी पाडली तेव्हा बिळात होतात. मला घंटाधारी हिंदुत्व नको आमचं गदाधारी हिंदुत्व आहे. लवकरच मी सभा घेणार आणि मास्क बाजूला ठेवून मी बोलणार आहे. हे जे नकली हिंदुत्ववादी आलेत त्यांचा मला समाचार घ्यायचाय. ज्यांच्या पोटात मळमळत आहे, जळजळत आहेत, त्यांनी त्यांच्या राज्यात किती विकास केला हे सांगा, आम्ही त्यांना काडीची किंमत देत नाही..'' 


5. राजद्रोह प्रकरणात जामीन मिळवण्यासाठी राणा दाम्पत्याचा खटाटोप, आज सत्र न्यायालयात अर्ज करणार, पोलीस छळ करत असल्याचा आरोप करत लोकसभाध्यक्षांना पत्र


पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 26 एप्रिल 2022 : मंगळवार



6. तीन वर्षांत 15 हजारांहून अधिक बालविवाह, 16 आदिवासीबहुल जिल्ह्यांच्या सर्वेक्षणानंतर राज्याचा उच्च न्यायालयात अहवाल


7. कोकणातील संभाव्य रिफायनरी परिसरात राज्याबाहेरील लोकांची जमीन खरेदी, 2019 ते 2022 दरम्यान मोठे व्यवहार


8. आजपासून दहावी आणि बारावी सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा, परीक्षांसाठी देशभरात एकूण 7412 परीक्षा केंद्रं


9. एलन मस्क ट्विटरचे नवे मालक, 44 बिलिनय डॉलरमध्ये खरेदी केली कंपनी


10. बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर 'द कश्मीर फाइल्स' ओटीटी प्लॅटफॉर्मवर, 13 मेपासून झी5 वर स्ट्रीम होणार