Latur News : काका पुतण्याचा वाद महाराष्ट्रासाठी काही नवीन नाही. कारण काका आणि पुतण्याचे वाद कायमच राज्यात चर्चेत येत असतो. तर राजकीय संघर्षामुळे अशा अनेक काका पुतण्याच्या वादाची कहाणी राज्याने पाहिल्या आहेत.  कधी पुतण्या काका वर नाराज असतो, मग त्याची नाराजी काढली जाते. समेट होतो आणि तो विषय काही काळासाठी बाजूला पडतो. असे अनेक किस्से आपण पहात आलो आहोत. मात्र लातूरच्या एका काका पुतण्याच्या वादाची कहाणी जरा हटके आहे.


काका विकलेल्या शेत जमिनीचे पैसे देत नाही, आणि वेगळ्या ठिकाणी शेत जमीनही घेऊन देत नाही. यामुळे चिडलेल्या पुतण्याने काका वरील रागात थेट मोबाईल टॉवर जवळ केला. पुतण्याने मागेपुढे काहीच न पाहता थेट टॉवरचे टोक गाठले. स्वतःचा संताप व्यक्त केला आणि सोबतच जीव देण्याची धमकीही दिली. शेवटी राज्यातील अनेक पुतण्याचे वाद जसे मिटले, तसाच हा देखील वाद मिटला. मात्र टॉवरवर चढल्याने पोलिसांनी पुतण्यास ताब्यात घेत कारवाई करण्याचे संकेत दिले. 


काय आहे प्रकरण? 


लातूर जिल्ह्यातील बुधोडा या गावातील काका पुतण्याचं हा वाद आहे. त्याचं झालं असे की, पंचवीस वर्षीय पुतण्या, ज्याचे नाव चांद इसुब शेख आहे. चांद याचे लग्न झाले असून, त्याला मुलं देखील आहे. तर दीड वर्षापूर्वी चांद शेख यांच्या काकाने सामाईक शेत जमीन विकली. जमीन विकताना चांदच्या वाटेचे पैसे किंवा दुसरी जमीन घेऊन देण्याचे काकाने आश्वासन दिले होते. चांद याचा हिस्सा हा 45 लाखापेक्षा अधिकचा होता. मात्र आता काकाने शब्द पाळायला तयार नाही.  चांद याने अनेकदा काकाकडे तगादा लावला. विंनती केली, पण काकाने दाद दिली नाही. शेवटी हतबल झालेला पुतण्या संतापाच्या भरात मोबाईल टॉवरवर चढला. पाहता-पाहता त्याने टॉवरचे टोक गाठले. 


अन् घटनास्थळी पोलीस पोहचले...


चांद टॉवरवर चढल्याची माहिती काही वेळातच संपूर्ण गावात पसरली. दरम्यान गावातील तरुणांनी ही घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद करून पोलिसांना पाठवली. त्यामुळे पोलिसाचे एक पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान चांद याची समजूत काढण्यात आली. त्यानंतर चांद टॉवरवरून खाली उतरला आणि सगळ्याचा जीव भांड्यात पडला. काकांनी आणि मध्यस्थ लोकांनी काय आश्वासन दिलं माहीत नाही. पण एका पुतण्याचे बंड मोडण्यात काकाला यश आलं. त्यामुळे परिसरात या काका पुतण्याच्या वादाची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Latur Freestyle : 'त्या' दोघी भिडल्या; दंडाच्या रक्कमेवरून टोईंग कर्मचारी आणि वाहन चालकात लातूरमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी, व्हिडीओ व्हायरल