लातूर: भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar)

  वादानंतर आता राज्यात राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) आणि आंबेडकर यांच्यातील वाद समोर येत आहे. जयंत पाटील हेच अर्धे भटजी आहेत, मोठे भटजी जर तारीख काढत नसेल तर छोट्या भटजीने लग्नाची तारीख काढावी असं प्रत्युत्तर वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी जयंत पाटलांना लगावला आहे. 


आमचा आणि शिवसेनेचा साखरपुडा झाला आहे, पण लग्नाच्या कार्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीरूपी दोन भटजींचा अडथळा असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं होतं. त्यानंतर त्याला जयंत पाटलांनी उत्तर दिलं होतं. लग्न करण्यास दोघेही उत्सुक असल्यास पळून जाऊन लग्न करण्याचा पर्याय असल्याचं जयंत पाटलांनी म्हटलं होतं. त्यावर आता प्रकाश आंबेडकरांनी उत्तर दिलं आहे. 


जयंत पाटील हे अर्धे भटजी 


प्रकाश आंबेडकरांनी जयंत पाटलांना प्रत्युत्तर देताना म्हटलं की, जयंत पाटील हेच अर्धे भटजी आहेत. मोठा भटजी जर तारीख काढत नसेल तर छोट्या भटजीने लग्नाची तारीख काढावी. भटजी हा जयंत पाटील यांच्या बाजूलाच बसलेला आहे. त्या भटजीच्या नाड्या या नरेंद्र मोदी यांच्या हातात आहेत. त्यामुळे जयंत पाटील जेव्हा अजित पवार पहिल्यांदा शपथविधी घ्यायला गेले होते तेव्हा त्यांच्या बाजूला उभे होते. त्याचमुळे अर्धे भटजी ते पण आहेत. मोठा भटजी जर तारीख काढत नसेल तर छोट्या भटजीने लग्नाची तारीख काढावी.


निवडणुकीपूर्वी भाजप देशात अराजकता निर्माण करणार


लोकसभेची निवडणूक समोर ठेवून देशात दिवाळीनंतर अराजक परिस्थिती निर्माण करण्यात येईल असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केंद्रातील सत्ताधाऱ्यांवर केला आहे. 'हिंदू खतरे मे है' हा संदेश देत हिंदुंना पाकिस्तान आणि मुसलमानांच्या विरोधात उभे केले जाईल. जो पाकिस्तान सध्या आर्थिक मंदीत अडकला आहे आणि विविध देशांसमोर भीक मागत आहे त्या पाकिस्तानची भीती भारतातल्या लोकांना घातली जाईल. जातीय तेढ आणि दंगली निर्माण करून हिंदुंमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण केली जाईल. या सर्व बाबीचा लाभ फक्त भारतीय जनता पक्ष आणि आरएसएस घेणार आहे. तरी सर्वसामान्य लोकांनी यांच्या भूलथापांना बळी पडू नये.


ही बातमी वाचा: