Cow-Slaughter :   गोरक्षक आणि कत्तलखाना येथील समाजाचे कायमच वाद होत असतात. कधी कधी हे वाद उग्र स्वरूप घेतात आणि यामुळे जातीय सलखो टिकून राहत नाही. यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी लातूर येथील दोन्ही बाजूचे लोक एकत्र आले होते. यात कुरेशी समाजाच्या नेत्यांनी आम्ही गोवंश हत्या करणार नाही शिवाय कोणी समाजातील व्यक्ती ते करत असेल तर त्याच्या विरोधात आम्हीच पोलिसात तक्रार देऊ असा शब्द कुरेशी समाजाने पोलीस ठाण्यात दिलाय.


हे सगळं होण्यामागे कारण ठरलं ते लातूर शहरात दोन दिवसापूर्वी झालेला एक वाद. गोरक्षक यांनी कत्तलखान्यात जाणाऱ्या गाई पकडल्या. त्यावरून दोन गट आमने सामने आले आणि हे प्रकरण पोलिसात गेले.  लातूर पोलिसांनी दोन्ही बाजूकडील लोकांना बोलवून घेत त्यांना समजावून सांगितले. पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे गोरक्षक किंवा कुरेशी समाज कायदा हातात घेणार नाहीत ..काहीही शंकास्पद वाटले तर पोलिसांना सूचना करतील. 'हिंदू धर्मात पूजनीय असलेले गोवंश ची कत्तल यापुढे कोणी करत असेल तर कुरेशी समाज त्या व्यक्तीची तक्रार पोलिसात करतील', अशा प्रकारची समज कुरेशी समाजाला आणि गोरक्षकांनी देण्यात आली आहे. गोवंश हत्या बंदी कायदा असताना ही बेकायदा पद्धतीने गायींची कत्तली केला जातेय. यामुळे गोरक्षक आणि गोवंश हत्या करणारे यांच्यात कायम वाद होत असतात. यामुळे परिणामी जातीय सलोखा भंग पावत असतो.  कोणीही कायदा हातात घेऊ नये, कोणतेही बेकायदा काम होत असेल तर तात्काळ पोलिसाशी संपर्क साधावा असे आवहान पोलीस उप अधीक्षक निकेतन कदम यांनी केले आहे.


दोन दिवसापूर्वी लातूरमध्ये दोन गट आमने सामने आले होते. या वादानंतर  लातूर शहरात काही प्रमाणात तणाव निर्माण झाला होता, मात्र दोन्ही समाजातील लोकांनी एकत्र येत हा वाद सतत होऊ नये यासाठी आपण प्रयत्न करावा असा विचार मांडला. लातूर पोलिसांनीही सामंजस्याच्या भूमिकेमध्ये महत्वपूर्ण भूमिका घेतली होती. गोवंश हत्या बंदी कायदा असताना काही लोक हे कृत्य करत आहेत आणि याचा थेट परिणाम समाजातील इतर घटकांवर होतोय. गोरक्षकांच्या रोषाला समाजातील इतर लोकांनाही बळी पडावे लागते आहे. शिवाय दोन्ही बाजूचे लोक कायदा हातात घेत आहेत. कायदा कुणीही हातात नं घेता कायद्यानं सगळं काही पार पडावं हाच विचाराचा धागा पकडून विवेकानंद पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूच्या लोकांनी एकत्र येत सामंजस्याची भूमिका घेतली. 


"कायदा सर्वांसाठी समान असतो, कायद्याचं कुणी जर पालन करत नसेल तर त्याला योग्य ते शासन झालेच पाहिजे. कायदा हातात घेणे चुकीची बाब आहे आणि समाजातील व्यक्ती जर गो हत्या करत असेल तर त्याची आम्ही तक्रार पोलिसातच करू" असे मत अफजल कुरेशी यांनी व्यक्त केलंय. "पोलिसांनी जमतेच्या या सामंजस्याच्या या  धोरणाला मदत करण्याची जी भूमिका आहे ती निश्चित कौतुकास्पद आहे. गोवंशाचे संरक्षण करण्याची गोरक्षकांची जी भूमिका आहे त्याला कुरेशी समाजाणे दिलेला पाठिंबाही स्वागतार्ह आहे" असे मत मनोज डोंगरे यांनी व्यक्त केले आहे.