Latur Rain Update : लातूर जिल्ह्यात मागील पाच दिवसापासून ढगाळ वातावरण आहे. दिवसातून अनेक वेळा पावसाच्या हलक्या आणि मध्यम सरी पडून जात आहेत. जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावली होती. मात्र बुधवारी मध्यरात्रीनंतर जिल्ह्यात सर्व दूर पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत. पहाटेपासून पावसाचा जोर चांगलाच वाढला होता.
लातूर जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ
लातूर, लातूर ग्रामीण, रेणापूर, उदगीर औसा, किल्लारी, लामजना, निलंगा, औराद शहाजानी, अंबुलगा, उदगीर, जळकोट, अहमदपूर या भागात पावसाने चांगलाच जोर धरला होता. जळकोट तालुक्यात दुपारनंतर तुफान पाऊस बरसला आहे. या भागातील पुढे नाले दुथडी धरून वाहत आहेत. ठिकठिकाणी पाणी साचलं आहे.
पाच दिवसापासून ढगाळ वातावरण सूर्यदर्शन नाही
मागील पाच दिवसापासून लातूर जिल्ह्यात सातत्याने ढगाळ वातावरण पाहावयला मिळत आहे. सततच्या पावसामुळे सूर्यदर्शन होत नाही. सोयाबीन आणि इतर कोवळी पिके पावसामुळे कोमजून गेली आहेत. सातत्याने होणारा पाऊस, उन्हाचा अभाव यामुळे ही पिके आता रोगाला बळी पडत आहेत. त्यातच गुरुवारी मध्यरात्रीपासून संध्याकाळपर्यंत पावसाची सारखी रिपरिप सुरू होती. सतत होणाऱ्या पावसामुळे शेतात जर, पाणी थांबलं तर कोवळ्या पिकांना यामुळे मोठे नुकसान होणार आहे.
तुफान पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान
मागील दोन दिवसापासून तुफान पाऊस झाल्यामुळे जळकोट तालुक्यातील 300 पेक्षा जास्त शेतकऱ्यांची 400 एकर पेक्षा जास्त जमीन अक्षरशा खरवडून गेली. कमी कालावधीमध्ये जास्त झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. पावसाने शेतीचे नुकसान झालेले शेतकरी एक वेळ सहन करू शकेल मात्र, जमीनच खरवडून गेल्यानंतर काय करावं, असा प्रश्न आता शेतकऱ्यासमोर उभा आहे. या भागातील शेतकऱ्यांनी आर्थिक मदतीसाठी प्रशासनाला निवेदन दिलं आहे.
शेतीचा प्रश्न मिटला, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जैसे थेच
मागील पाच दिवसात सातत्याने होणारा पाऊस असला तरी, तो हलक्या स्वरूपाचा आहे. काही भागात पावसाची तुफान बॅटिंग पहायला मिळत आहे. मात्र, जिल्ह्याभरात हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरु आहे. या पावसाचा फायदा फक्त शेतीला होताना दिसून येत आहे. मात्र, जिल्हाभरातील प्रकल्पामध्ये पाणीसाठ्यात वाढ झालेली नाही. त्यामुळे मोठ्या पावसाची अपेक्षा अद्यापही कायम आहे.
मागील 24 तासात जिल्हाभरातील पावसाची आकडेवारी
जिल्ह्यामध्ये आजतोपात 235.7 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे, ही सरासरीच्या 98 टक्के इतकी आहे. मागील 24 तासात जिल्ह्यामध्ये सरासरी 8.2 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यात सर्वाधिक पाऊस देऊनी तालुक्यामध्ये 16.7 मिलिमीटर आहे.
- लातूर 4.4 मिलिमीटर
- औसा 7.6 मिलिमीटर
- उदगीर 12.6 मिलिमीटर
- चाकूर 8.9 मिलीमीटर
- शिरूर अनंतपाळ 13.3 मिलीमीटर
- जळकोट 8.3 मिलिमीटर
- अहमदपूर 9.2 मिलिमीटर
- निलंगा 11.4 मिलिमीटर
- रेनापुर 2.8 मीटर
- देवणी 16.7 मीटर
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Latur Viral Video : मंदिरात नंदी दूध पित असल्याचा व्हिडीओ व्हायरल, दावा सिद्ध करणाऱ्याला अंनिसकडून 21 लाख रुपयांचं बक्षीस