लातूर : कोणत्याही शहरातील जुन्या गाव भागात आणि चिंचोळ्या ठिकाणी आग लागल्यानंतर अग्निशमन दलाची गाडी पोचू शकत नाही. यामुळे जीवित आणि वित्तहानी मोठ्या प्रमाणात होत असते. यावर उपाय शोधण्यासाठी अनेक प्रयत्न झाले, मात्र त्याला यश आले नव्हते. आता मात्र यावर अत्याधुनिक उपाय शोधण्यात आला आहे आणि तो म्हणजे फायर बुलेटचा. लातूर जिल्ह्यासाठी तेरा फायर बुलेट मंजूर झाल्यानंतर त्यापैकी सहा फायर बुलेटचे शनिवारी लोकार्पण करण्यात आलं.
फायर बुलेटवरून अग्निशमन दलाचे दोन कर्मचारी प्रवास करू शकतात. ज्या ठिकाणी आग लागली त्या ठिकाणी तात्काळ पोचून आग विझवण्याचे काम सुरू केले जाऊ शकते. लातूर जिल्ह्यातील औसा येथे दोन, अहमदपूर येथे दोन आणि उदगीर येथे चार फायर बुलेट देण्यात आले आहेत. लातूर जिल्ह्यासाठी एकूण 13 फायर बुलेट मंजूर करण्यात आल्या आहेत. त्यापैकी सहा फायर बुलेट रविवारी दाखल झाले आहेत.
अग्निशमन दलाचे अत्याधुनिकीकरण करणे, त्यामध्ये जलदता आणणे, कमी खर्चामध्ये, कमी मनुष्यबळामध्ये घटनास्थळापर्यंत तात्काळ पोहोचविण्यासाठी यंत्रणा निर्माण करणे हा उद्देश समोर ठेवून फायर बुलेटची रचना करण्यात आली आहे.
रॉयल एनफिल्ड 350 सीसीची बुलेट मॉडीफाईड करण्यात आली आहे. यामध्ये दोन फोम सिलेंडर ज्याची क्षमता नऊ लिटरची आहे, बसवण्यात आले आहेत. याचा प्रेशर 312 हॉर्स पॉवरचा असेल. या गाडीबरोबर प्रथमोपचारासाठी आवश्यक असणारे किट देण्यात आले आहे. या बुलेटवर दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अग्निशमनाची यंत्रणा गतिमान करण्यासाठीचा उपक्रम
आग लागल्यानंतर तात्काळ ती विझवली तर आगीची परिणामकारकता वाढत नाही. अग्निशमन दलाच्या गाड्यांचा वेग हा कमी असतो. गल्लीबोळात आणि अरुंद रस्त्यावर अग्निशमन दलाची गाडी काम करू शकत नाही. या सर्व बाबी लक्षात घेतल्यानंतर फायर बुलेटची संकल्पना राबवण्यात आली आहे.
आग लागल्यानंतर प्रथम उपचार म्हणून तात्काळ ही गाडी आग लागलेल्या ठिकाणी दाखल होईल. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ते प्रयत्न करतील. आग मोठी असेल तर अग्निशमन दलाची गाडी त्यांच्या पाठोपाठ घटनास्थळी दाखल होईल. अशा एकत्रित कामामुळे आगीमुळे होणारी जीवित आणि वित्तहानी टाळता येऊ शकते.
गिरीश महाजन यांच्या हस्ते लोकार्पण
लातूर जिल्ह्यात दाखल झालेल्या सहा फायर बुलेट गाड्यांचे लोकार्पण लातूरचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे आमदार रमेश कराड आणि लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्यासह अग्निशमन दलातील कर्मचारी हजर होते.
ही बातमी वाचा: