लातूर : शरद पवार (Sharad Pawar) यांची मराठा आरक्षणाच्या प्रश्नी (Maratha Reservation) दुटप्पी भूमिका असल्याचा आरोप राज्याचे मंत्री आणि भाजपचे नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केला. शरद पवारांनी पुढाकार घ्यावा मराठा आरक्षण प्रश्न सोडवावा असं आवाहनही त्यानी केलं. लातूरचे पालकमंत्री म्हणून गिरीश महाजन हे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 


मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तुम्ही पुढाकार घ्या असं शरद पवारांना आवाहन करत गिरीश महाजन म्हणाले की, शरद पवार हे चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून राहिले आहेत. मात्र त्यांनी मराठा आरक्षणावर तोडगा काढला नाही. तुम्ही पुढाकार घ्या. आम्ही तुमच्या मागे येऊ. कारण तुम्ही एवढे दिवस सत्तेत राहिले आहेत आणि मराठा आरक्षण प्रश्न हा सर्व पक्षाच्या बैठकीतून सोडविता आला असता. पण सगळे विरोधी पक्ष हे गैरहजर राहिले. यावर काय संमजायच?


मराठा आरक्षण प्रश्न राज्यात सोडवावा


आरक्षणाचा प्रश्न राज्यानेच  सोडवावा, केंद्रात जाऊन काहीच होणार नाही असं शरद पवार यांनी सांगितलं होत. त्यावर गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, शरद पवार यांनी पुढाकार घ्यावा असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. सर्व नेते सांगत आहेत की शरद पवारांनी पुढाकार घ्यावा. त्यांनी आपल्या कारकीर्दीत काहीच केलं नाही. आपण मुख्यमंत्री होतात. राज्यात आपलं सरकार होतं त्यावेळी मराठा आरक्षणाचा मुद्दा उच्चारला नाही. आता सल्ला देता आहात, चांगलं आहे. ज्यावेळी सर्वपक्षीय बैठक बोलावली जाते त्यावेळी बैठकीला यायचं नाही, लोकांनाही येऊ द्यायचं नाही. नंतर लोकांना उपदेश द्यायचं हे काही योग्य नाही.  


शरद पवार यांची भूमिका दुटप्पी


गिरीश महाजन म्हणाले की, शरद पवार हे चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले आहेत, पण त्यांच्या काळात मराठा आरक्षणाचा म सुद्धा त्यांनी उच्चारला नाही. यामुळे शरद पवार यांनी सर्वपक्षीय बैठकीमध्ये येऊन हा प्रश्न सोडवावा असे स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. हा प्रश्न लवकरात लवकर सोडविणे गरजेचे आहे. शरद पवार हे बाहेर एक बोलतात आणि आतमध्ये एक बोलतात. यामुळे पवार साहेबांनी आधी भूमिका स्पष्ट करावी. 


ही बातमी वाचा: