नागपूर : उदगीर पोलीस स्टेशनमधील कार्यक्रमासंदर्भात चुकीची माहिती देण्यात आली आहे. गुन्हे कमी करण्यासाठी बोकड कापला नाही. तर एका पोलीस कर्मचाऱ्यांने नवीन गाडी घेतली होती. त्यामुळे त्याने सहकाऱ्यांना ती पार्टी दिली. असं असलं तरीही तो प्रकारच चुकीचाच आहे. त्यामुळे त्या प्रकाराची चौकशी करून योग्य त्या कारवाईचा आदेश दिले आहेत. उदगीर पोलीस ठाण्यात बोकड कापून पार्टी झाल्याच्या बातम्या येत होत्या, त्यावर फडणवीसांनी स्पष्टीकरण दिलं. 


काय आहे प्रकरण? (Udgir Police Station Party) 


दिवसेंदिवस पोलिस ठाण्याच्या हद्दीत गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असल्याने त्यावर मार्ग शोधत पोलीस ठाण्याच्या गेटवरच पोलिसांनी बोकड कापून शांती केल्याची बातम्या समोर आल्या होत्या. हा प्रकार उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यामध्ये घडला आहे. विशेष म्हणजे याचा एक फोटो देखील समोर आला आहे. त्यावरून वाद निर्माण झाला. 


उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात सध्या कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांनी कारभार हाती घेतल्यापासून ठाण्याच्या हद्दीत अपघात आणि गंभीर गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहेत. त्यानंतर पोलिसांनी हा प्रकार केल्याची चर्चा सुरू झाली. 


बोकडच्या मटणाची बिर्याणी बनवली


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकाराला संपूर्ण पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्याची संमती होती. कारण बोकड कापताना ते फोटो काढत होते. त्यानंतर या बोकडाच्या मटणाची बिर्याणी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. बिर्याणी याच भागातील एका फार्म हाऊसवर बनविण्यात आल्याची माहिती आहे. एकीकडे राज्यातील अंधश्रद्धा संपवण्यासाठी सरकारकडून कायदे केले जात असून, याची महत्वाची जबाबदारी पोलिसांवर आहे. मात्र, लातूर जिल्ह्यात चक्क पोलिसच अंधश्रद्धेचा बाजार मांडत असतील तर सामान्य नागरिकांनी न्याय कोणाकडे मागवा असा प्रश्न उपस्थित होत आहे. 


गडचिरोलीतील प्रकारावर चौकशी सुरू


देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, गडचिरोलीवरून आलेली बस आली होती. त्यात एका डब्यात बॉम्ब सदृष्य वस्तू मिळाली. त्यात डेपो मॅनेजरने सगळे माहिती कळवली. त्याची छानपैकी करण्यात आली. बारूदसदृश्य काही गोष्टी दिसून आली आहे. त्यासंदर्भातील पुढची प्रक्रिया करू. याची सगळी चौकशी करणार आहोत. गडचिरोली पोलिसांना माहिती दिली आहे. ती बस कुठे कुठे गेली. कंडक्टर कोण होतं, प्रवासी कोण होतं, या सगळ्यांची माहिती घेणे सुरू आहे.


ही बातमी वाचा: