Latur News : राज्यातील अनेक भागात पावसानं (Rain) दडी मारली आहे, त्यामुळं दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची खरीपाची पिकं वाया गेली आहेत. मराठवाड्यातही (Marathwada) गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळं मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी लातूर जिल्ह्यात छावा संघटना (Chhava Sanghatna) आक्रमक झाली आहे. दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी छावा संघटनेच्या वतीनं मंत्री संजय बनसोडेंच्या (Minister Sanjay Bansode) घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.


छत्रपती संभाजीनगर येथे मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठवाड्यातील दुष्काळाबाबत कोणताही निधी देण्यात आला नाही. यावर्षी पावसाने पाठ फिरवली आहे. शेतकऱ्यांच्या शेतात पीक नाही, शिवारात पाणी नाही, यामुळं सरकारनं यावर गांभीर्याने विचार करत तात्काळ दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी छावा संघटनेनं केली आहे. मंत्री संजय बनसोडे हे ध्वजारोहणासाठी घरातून बाहेर निघाले होते. त्याच वेळेस छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरासमोर येऊन आंदोलन करत त्यांची गाडी अडवली. संजय बनसोडे यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधत त्यांचे निवेदन  स्वीकारलं.


राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस


विरोधी पक्षांकडून देखील राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली जात आहे. राज्यात पावसानं दडी मारल्यानं बळीराजा चिंतेत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्या सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील अने जिल्हे तहानलेलेच आहेत. विदर्भातील काही जिल्हे आणि कोकणात काही प्रमाणात पावसानं हजेरी लावली आहे. मात्र, अन्य भागात पावसानं दडी मारल्याचं चित्र दिसत आहे. त्यामुळं हातची पीकं वाया जाण्याची भीती निर्माण झालीय. त्यामुळं राज्यात पाणी टंचाईचं संकट येण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. 


तूर, सोयाबीन, मका, कांदा, फळबागा पिकांचं मोठं नुकसान 


राज्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. खरीपाची पिकं वाचवण्यासाठी राज्यातील शेतकरी चांगल्या पावसाची वाट बघत आहेत. शेतकऱ्यांच्या पिकांना पाण्याअभावी मोठा फटका बसला आहे. तूर, सोयाबीन, मका, कांदा, फळबागा इत्यादी पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. मागील महिन्यात पावसाचा 21 दिवसापेक्षा अधिक खंड पडलल्यानंतर चालू सप्टेंबर महिन्यात देखील पावसानं चांगलीच ओढ दिली आहे. त्यामुळं पिकांना मोठा फटका बसला आहे. काही भागात पिकांचे नुकसान हे 50 टक्यांहून अधिक असल्याचं समोर आलं आहे. तर काही भागात शेतकऱ्यांची पिकं वाया गेली आहेत. याच पार्श्वभूमीवर नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करत आहेत.


महत्त्वाच्या बातम्या:


Agriculture News : पावसाची दडी, दुष्काळाची दाहकता; करमाळ्यातील शेतकऱ्यानं पेटवली दोन एकर लिंबाची बाग