पुणे: पुणे जिल्ह्यातील बहुचर्चित लवासा प्रकल्पात दरड आणि माती कोसळण्याचे प्रकार गेले दोन दिवस सुरु आहेत. त्यामुळे लवासाचा रस्ता बंद झाल्याने अनेक पर्यटक लवासात अडकून पडले आहेत.


 

लवासामधे तीन ठिकानी दरड कोसळून डोंगरावरची माती रस्त्यावर आली आहे. लवासाकडुन ही माती आणि दरड हटवण्याचं काम सुरु आहे. परंतु सतत कोसळणाऱ्या पावसामुळं रस्ता खुला करण्यात अडथळे येत आहेत.

 

दुसरीकडे लवासात येणाऱ्या पर्यटकांना लवासाच्या गेटवरच थांबवण्यात येत आहे. त्यामुळे त्यांचा हिरमोड झाला आहे. लवासामध्ये रात्रभर पडत असलेल्या पावसाने डोंगरावरची माती रस्त्यावर आली. लवासामध्ये कालपासून डोंगरावरची माती रस्त्यावर आली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात चिखल झाला आहे.