मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादूकोणने तिच्या मानधनात घसघशीत वाढ केली आहे. आगामी 'पद्मावती' या सिनेमासाठी दीपिकाला तब्बल 12.65 कोटी रुपये मानधन म्हणून देण्यात आले आहेत. यासोबतच 10 कोटींचा आकडा पार करणारी ती पहिली बॉलिवूड अभिनेत्री बनली आहे.

 

'रामलीला'साठी दीपिकाला एक कोटी रुपये मानधन मिळालं होतं. त्याच्या दोन वर्षांनंतर 'बाजीराव मस्तानी'साठी तिने सात कोटी रुपये आकारले होते. आता 'पद्मावती'साठी तिने 12.65 कोटी रुपये घेतले आहेत.

 

पुढील महिन्यापासून 'पद्मावती' सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात होईल. तर 'ट्रिपल एक्स : रिटर्न ऑफ झँडर केज' हा तिचा पहिला हॉलिवूड चित्रपट 2017 मध्ये प्रदर्शित होणार आहे. ट्रिपल एक्समध्ये दीपिका विन डिझेलसोबत दिसणार आहे.